जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेतर्फ ऑगस्ट 2021 मध्ये संपन्न झालेल्या सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील पूर्वउच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी मध्ये तालुक्यातील शिऊर येथील जि.प.प्रा.शाळा लटकेवस्तीचे 10 विद्यार्थी पात्र ठरले असून मागील सलग 5 वर्षी 100%निकाल लागणारीआणि अनेक वर्षांपासूनची गुणवत्तेची परंपरा अखंडित राहिल्याबद्दल पात्र विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
ADVERTISEMENT

पात्र विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वीराज प्रमोद पिंपरे (286गुण), प्रियंका दत्तात्रय वराट (220गुण),तन्वी सतिश अनभुले(220गुण),साईराज दादा लटके (214गुण),अंबिका भाऊसाहेब लटके(212गुण), शिवानी रामचंद्र लटके (198गुण),सोहम आजिनाथ निकम (182 गुण),संस्कृती नागनाथ पवार (174गुण) आणि अविष्कार विवेक गर्जे(168 गुण)या विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना श्रीमती पवार मॅडम व श्रीमती गाढवे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.
शासन स्तरावर आयोजित करण्यात येत असलेल्या विविध स्पर्धा परीक्षांपैकी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेस अत्यंत महत्त्वाचे स्थान असून विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन स्पर्धा परीक्षांचा ही परीक्षा पाया असल्याचे मानले जाते.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी मा.श्री प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी मा.श्री.नागनाथ शिंदे, विस्तार अधिकारी मा.श्री. कांतीलाल ढवळे ,नायगावचे केंद्रप्रमुख मा. श्री. किसन वराट, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा.श्री गौतम आण्णा उतेकर, शिऊरचे सरपंच मा. श्री. हनुमंत उतेकर, उपसरपंच मा.सौ. स्वाती लटके.,पोलीस पाटील मा.श्री.अमोल गायकवाड ,शाळा व्यवस्थापन समिती लटकेवस्तीचे अध्यक्ष मा.श्री.नवनाथ लटके व उपाध्यक्ष मा.श्री.रामचंद्र लटके यांसह सर्व पालक,ग्रामपंचायत सदस्य,लटकेवस्तीचे ग्रामस्थ आणि नायगाव केंद्रातील शिक्षक बंधुभगिणी यांनी अभिनंदन केले आहे.