खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप

0
231

जामखेड प्रतिनिधी

          जामखेड न्युज – –
  नगर दक्षिणचे  खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्य़ा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
                           ADVERTISEMENT
         
      यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट सर, कोल्हेवाडी सेवा संस्थेचे अध्यक्ष सुदाम कोल्हे, साकतचे उपसरपंच बळी कोल्हे, राजाभाऊ कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक कोल्हे, मुख्याध्यापक राधेश्याम मुरुमकर, सुनिल भालेराव, अशोक वराट, नितीन मुरुमकर यांच्या सह अनेक मान्यवर व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
     शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला अर्धा डझन म्हणजे सहा वह्या वाटप करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसुन येत होता. सर्व विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here