Tuesday, March 31, 2026
Home ताज्या बातम्या प्रेमी युगलाची आत्महत्या – प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही घेतला गळफास दोघांनाही संपवले जीवन

प्रेमी युगलाची आत्महत्या – प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही घेतला गळफास दोघांनाही संपवले जीवन

0
741
जामखेड प्रतिनिधी 
तालुक्यातील आपटी या ठिकाणी अल्पवयीन प्रेयसी मुलीच्या आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगी व मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप माहिती समजु शकले नाही.
                        ADVERTISEMENT
     
अशोक बंडु कडु, (वय २३) रा. आपटी
व आशा (उर्फ अश्विनी) गोपीनाथ घुले (वय १६) रा. घोडेगाव ता. जामखेड अशी आत्महत्या केलेल्या दोघा अल्पवयीन प्रियकर व प्रेयसीची नावे आहेत. या बाबत समजलेली माहिती अशी की बुधवार दि २४ रोजी जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी प्रेयसी मुलगी आशा गोपीनाथ घुले वय १६ हीने सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान. मामाच्या  घरी अॅगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ती माहिती याच गावात राहणार्‍या तिचा प्रियकर अशोक बंडु कडु वय २३ रा. आपटी यास समजली यानंतर आपल्या प्रेयसीने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी तो प्रियकर अशोक कडु हा मुलीच्या घरी गेला त्या वेळी आपल्या प्रियसीने आत्महत्या केली आसल्याचे समजले. या नंतर सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला या नंतर तीचा प्रियकर अशोक कडु या मुलाने देखील व्हॉटसप वर मी देखील माझे जीवन संपवत आहे असा स्टेट्स ठेवला होता. आणि जे व्हायचे तेच झाले. त्याच दिवशी दि २४ रोजी काही तासातच म्हणजे दुपारी तीनच्या दरम्यान मुलाने देखील शेतातील चिंचेच्यडा झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या बाबत दोघांनीही आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नसुन दोघांचे प्रेम संबध होते अशी माहिती समोर आली आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सपोनि सुनिल बडे, पो. ना संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी मस्के व पो. कॉ. संजय जायभाय यांनी भेट दिली.
पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
   मुलीने आत्महत्या केल्यावर मुलीकडील मंडळी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते. पण एका तासात मुलानेही आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!