जामखेड न्युज – – –
श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावातील शाळकरी मुलाचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे दुर्देवी असा अंत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण येळपणे गावावर व लकडे परिवारावर कधीही भरून न निघणारा दुःखाचा आघात झालेला आहे.
ADVERTISEMENT

येळपणे गावातील ठाणगेवाडी येथील अभिषेक बाळू लकडे (वय 11) हा विहिरीच्या कडेला असलेल्या बोराच्या झाडाला बोरे काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला व त्यामध्ये त्याचे दुर्देवी मृत्यू झाला. तो बराच वेळ झाला तरी घरी न आल्यामुळे त्याचा शोधाशोध घेतल्यामुळे विहिरीच्या कडेला त्याची चप्पल दिसून आली व संशय आल्यामुळे बांबूच्या सहाय्याने विहिरीमध्ये पाहिले असता विहिरीत असल्याचे शंका आली बाहेर काढले असता,अभिषेक चा दरम्यान मृत्यू झाला होता.
अभिषेक श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालय येळपणे येथे इयत्ता सहावी मध्ये शिकत होता. तो अत्यंत हुशार होता. अभिषेक चे वडील हे शेती करत आहे. व आईचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे लकडे कुटुंबावर हा दुहेरी आघात झालेला आहे.