जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
शिख धर्माचे संस्थापक गुरूनानक साहिब यांनी आपले जीवन मानव जातीच्या उध्दारासाठी अर्पण केले. तसेच एकात्मतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपणही आपले कल्याण करून घ्यावे असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळ दिल्लीचे जामखेड तालुका समन्वयक व महाराष्ट्र बेकरीचे संचालक अमित गंभीर यांनी केले.
जामखेड शहरातील शहरातील तपनेश्वर रोड येथे शिख बांधवाचे श्रध्दास्थान संत गुरूनानक यांची ५५२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बोलताना ते म्हणाले की, गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते. लहानपणी मौंजीबंधनावेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या.
सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते.
या प्रसंगी प्रशांत आरोरा, चेतन आरोरा, टिंकू गुलाटी, विशाल गुलाटी, संजय गुलाटी, देवेंद्र आरोरा, दर्शन आरोरा, मनीष तीनिया, करण गुलाटी, गौरव गुलाटी, गौरव गंभीर, गुल्लू अहुजा, पियुष गंभीर, आयुष गंभिर तसेच महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी जयंतीनिमित्त येथे धार्मिक कार्यक्रमांसह अखंड भजन पाठण करण्यात आले. या अखंड पाठाची समाप्ती आज दि. २० रोजी करण्यात आली यावेळी संत गुरुनानक यांचे प्रतिमा दर्शनासाठी व ‘गुरु का लंगर’ व्दारे आयोजित महाप्रसादासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील काळामध्ये जामखेड येथे शिख समाज बांधवानी एकत्रित येवुन गुरुनानक जी यांच्या विचाराने समाज कार्यात सहभाग घेवून जयंती साजरी करण्याचा निश्चय यावेळी त्यांनी केला.
यावेळी उपस्थितांचे आभार करण गुलाठी यांनी मानले.