प्रांताधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणार्‍या पोलीसाला बडतर्फ करावे, ३५३ नुसार गुन्हा दाखल करावा अन्यथा जामखेड महसुल कर्मचारी सोमवारपासून करणार बेमुदत कामबंद आंदोलन

0
282
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट ) 
उपविभागीय अधिकारी कर्जत मा. डॉ. श्री. अजीत थोरबोले यांना अवैध गौणखनिज वाहतुकीविरुध्द कारवाई करताना वाळुतस्करीत सहभागी पोलीस
कर्मचाऱ्याने धक्काबुक्की करुन वाहतुक करणारे गौणखनिजाचे वाहनअनाधिकाराने पळवून नेवून दुर्वतन केलेने त्यास बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करीत असलेबाबत आज जामखेड महसुल कर्मचार्‍यांनी नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास सोमवार पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दिनांक 19/11/2021 रोजी सकाळी 7.27 वाजता मौजे कर्जत येथे मा. डॉ. अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कर्जत येथे पथकासह अनधिकृत गौण खनिज गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रतिबंधक कार्रवाई कामी जात असताना शहारातील बालाजीनगर परीसरात ट्रक क्रमांक एमएच 12 आर एन 4704 हा गौणखनिजाची अवैध वाहतुक करत असताना आढळून आला. पथकासमोर तो वाळू वाहनातून
खाली करीत होता. संबंधित वाहनावर प्रतिबंधात्मक कारवाई करत असताना कर्जत पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे यांने प्रांताधिकारी यांना धक्काबुक्की केली व ट्रक जबरदस्ती पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा आणला.
महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी हे जीव मुठीत घेवून अवैध गौण खनिज कारवाई करीत असताना अशा कारवाईमध्ये विभागास कारवाई साठी मदत न करता उलट वाळू तस्करीस पाठबळ देऊन तस्करीत सहभाग घेतलेला दिसून येतो. त्याने केलेले बेकायदेशीर कृत्य व मा. प्रांताधिकारी यांचेशी केलेले उध्दट वर्तन याचा आम्ही सर्व महसुल कर्मचारी, तलाठी, मंडळअधिकारी, कोतवाल व शिपाई सर्वजण तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत.
शासकीय सेवक असूनही शासकीय कर्तव्यात स्वत: कसुर करुन इतर विभागास कामकाजास अडथळा आणणाऱ्या अशा कर्मचाऱ्यावर 353 कलम दाखल करुन बडतर्फ
करावे या मागणीसाठी आम्ही सर्व महसुल कर्मचारी सोमवार दिनांक 22/11/2021 पासून मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहोत. त्यासंदर्भात हे निवेदन आज दि. 20/11/2021 रोजी मा. तहसिलदार जामखेड यांना दिले आहे.
    सदर निवेदन नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना दिले यावेळी तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष एस. के. कारंडे, उपाध्यक्ष एस. व्ही. कुटे, मंडलाधिकारी एन. यु. गव्हाणे, व्हि व्हि. चौगुले, एस. एस. हजारे, बी. एस. लटके, अनिता जाधव मॅडम, जाधव मॅडम, भाऊसाहेब खिळे,  शेख भाऊसाहेब, शेख भाऊसाहेब, कटारनवरे भाऊसाहेब उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here