जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
गेल्या वर्षभरापासून प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १७ जानेवारी रोजी एकुण १८ जागेसाठी निवडणूक होत आहे.
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून दि. १७ जानेवारी २०२२ रोजी एकुण १८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीत माजीमंत्री प्रा. राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी असे दोन पॅनल असतील अशी शक्यता आहे.
ADVERTISEMENT 

जामखेड बाजार समितीच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपल्याने गेली वर्षभरापासून प्रशासक कारभार पाहत आहेत.
जाहिर झालेल्या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी नेमणूक झाली असून त्यांनी नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीत दुरूस्ती किंवा हरकतींसाठी २२ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून यानंतर आलेल्या हरकतींवर कार्यवाही नंतर दि. ६ डिसेंबर रोजी अंतीम मतदार यादी जाहीर करण्यात येईल.
ADVERTISEMENT

जाहिर केलेल्या प्रारूप मतदार यादी नुसार तालुक्यातील ५७ गावांचा यात सामावेश करण्यात आला असून सेवा सोसायटी मतदारसंघात ५११, ग्रामपंचायत मतदारसंघात ६१५, व्यापारी मतदार संघ ३६३, हमाल मापाडी मतदार संघात १५० मतदारांचा समावेश आहे. असे एकुण १६३९ मतदार आहेत.
ADVERTISEMENT

दि. १६ ते २२ डिसेंबर नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) विक्री व स्विकृती, दि. २३ रोजी आलेल्या अर्जांची छाननी, २४ रोजी वैद्य उमेदवारी अर्ज जाहीर करणे, २४ डिसेंबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेणे. यानंतर १० जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांसह उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येऊन दि. १७ जानेवारी २०२२ रोजी मतदान व लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.



