विघ्नसंतोषी लोक समाजात तेढ निर्माण करतात – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
243
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
महाविकास आघाडीचे सरकार देशात चांगल्या पद्धतीचे सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहे पण हे चांगले काही विघ्नसंतोषी लोकांना ते पाहवत नाही म्हणून ते सतत काहीतरी कुरापती काढून दंगल, हिंसा करण्याचा प्रयत्न करत असतात. तरुणांना भडकवण्याचे काम काहीजण करत आहे, मात्र जनतेने विशेष करून तरुणांनी अशा दिशाभूल करणाऱ्या समाजकंटकां पासून सावध राहिले पाहिजे. हे राज्य सर्वसामाजाला सोबत ठेवून स्वराज्य चालवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे, जाती-पाती-धर्माचे राजकारण न करता एकोप्याने सर्वांनी वागावे. हिंसाचारात गरिबांचे नुकसान होते त्याचा विचार करून वागा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
                      ADVERTISEMENT
आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत  जामखेड येथे संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (तथा मंत्री- वित्त व नियोजन विभाग), अशोकजी चव्हाण साहेब(मंत्री- सार्वजनिक बांधकाम विभाग) बारामती ॲग्रो’चे राजेंद्र पवार,  आमदार रोहित पवार, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, विनायक देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, शहाजी राळेभात, शहाजी राजेभोसले, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, सुर्यकांत मोरे, काॅग्रेस च्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योती गोलेकर, काॅग्रेसचे राहुल उगले, राजेंद्र पवार, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, संजय वराट, विजयसिंह गोलेकर, रमेश आजबे, महेश निमोणकर, दिंगाबर चव्हाण, पवन राळेभात, लक्ष्मण ढेपे यांच्या सह महाविकास आघाडीच्या विविध पक्षांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
                    ADVERTISEMENT
    यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, कर्जत-जामखेडची जनता सुज्ञ आहे कोण विकास करणार हे त्यांना चांगले ठाऊक आहे त्यामुळे पोकळ गप्पा मारणाऱ्याला ( राम शिंदे) यांचे नाव व घेता घरी बसवले आहे. त्यांनी आता निवांत बसावे ते मंत्री होते पण कामाचा दर्जा निकृष्ट होता आता कामाचा दर्जा चांगला राहणार आहे.
     
   जामखेड पाणीपुरवठा योजनेविषयी बोलताना पवार म्हणाले कि. माजी मुख्यमंत्र्यांनी थातूरमातूर कागद दाखवला होता त्यात अनेक त्रुटी होत्या रोहितने सर्व पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतले आता मोटार न लावता तिसर्‍या मजल्यावर पाणी जाईल सर्व शहरातील व वाडी वस्तीवरील लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळेल. लाईट विषयी बोलताना सांगितले की, आपण लाईटचा काटकसरीने वापर करावा. दिवसा लाईट बंद कराव्यात बिल वेळेवर भरावे तसेच एस. टी. संपाविषयी व आरक्षणाविषयी  बोलताना सांगितले की, कोणीही आत्महत्या करू नये सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.
   अद्यापही कोरोना गेलेला नाही आपणास तिसरी लाट सहन होणार नाही त्यामुळे प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला.
                         ADVERTISEMENT
         यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की,  आमदार कसा असावा तर रोहित पवारांसारखा तो विकासकाने झपाटलेला आहे. त्याने संपुर्ण कामाचा आराखडा तयार केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासासाठी निधी कमी पडणार नाही. दोन वर्षात रोहितने कर्जत-जामखेडमध्ये  98 कामे 637 कोटी रुपयांची कामे मंजूरी मिळवलेली आहेत.
 राज्याची तिजोरी रोहित पवारांच्या हातात आहे.
             त्रिपुरा कथित हिंसाचारावर बोलताना  मंत्री अशोक चव्हाण यांनी, देशाच्या इतर राज्यात होणाऱ्या घटनांचे पडसाद इथे पडणे दुर्दवी आहे. लोकांनी शांतता बाळगावी. काही लोकं सामाजिक तणाव निर्माण करण्याचे काम करत आहे, मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.?जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. असेही सांगितले.
                       ADVERTISEMENT
 
    यावेळी आमदार रोहितदादा पवार म्हणाले की,
  अनेक प्रश्न प्रलंबित होते. मागील पाच वर्षांत जे कामे झालेली नाहीत त्यापेक्षा जास्त कामे दोन वर्षात मंजूर करून आणली. मागे मंत्री आसताना रस्ते झाले नाहीत त्यापेक्षा जास्त रस्ते दोन वर्षांत मंजूर करून आणले, अजितदादांनी मतदारसंघाचे अनेक कामे मार्गी लावली.
 
 विरोधक हवेत गोळ्या झाडण्यात पटाईत आहेत. ते निष्क्रिय होते म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवले. तसेच
एमआयडीसी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. वखार महामंडळातर्फे गोडाऊन बांधले. येणाऱ्या बाजार समिती व नगरपरिषद निवडणूकीत जनतेने विकासाच्या पाठीशी उभे राहावे असेही आवाहन केले.
      आज उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सकाळी चौंडी येथे जाऊन अहिल्यादेवी होळकर यांचे दर्शन घेऊन जामखेड मध्ये आले शहरात उघड्या मोटारीतून त्यांची मिरवणूक काढली. यावेळी मोठय़ा संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here