गोपाष्टमी निमित्त धारकरी व वारकर्‍यांतर्फे गाईची मिरवणूक, पुजन व किर्तन सोहळा

0
207
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – -(सुदाम वराट) 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड संचलित श्री साकेश्वर गोशाळेत ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांचा किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या आगोदर सकाळी टाळ मृदंग तसेच बॅड पथकासह गावात मिरवणूक काढण्यात आली जागोजागी गाईचे पुजन करण्यात आले.

ADVERTISEMENT 

 

गोपाष्टमी निमित्त संभाजी भिडे गुरुजी यांचे धारकरी व साकत परिसरातील वारकरी यांनी पारंपरिक व धार्मिक पद्धतीने गोपाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला.
                   ADVERTISEMENT  
      यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर, संजय वराट, ह. भ. प. उत्तम महाराज वराट, गायक हरिभाऊ काळे, ह. भ. प. बिभिषण कोकाटे, ह. भ. प. ज्ञानेश्वर कोल्हे, बळीराम दळवी, विष्णू मुरुमकर, मनोहर मुरुमकर, महादेव लहाने, मृदंगाचार्य ह. भ.. प. बाजीराव वराट, उतरेश्वर वराट, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पांडुरंग भोसले, खंडागळे नाना, गोपालक आजीनाथ महाराज, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
                        ADVERTISEMENT  
   आपल्या संस्कृतीच्या परमोच्च बिंदू म्हणून ज्या विभुतीमत्वाकडे पाहिले जाते ती विभुती म्हणजे आखिल ब्रम्हांडनायक भगवान गोपालकृष्ण होय त्या गोपाळ कृष्णाच्या जीवनातील सेवेचा सेवेचा सर्वोच्चबिंदू म्हणजे गोमातेची सेवा होय या सेवेचा कन्हैयाने ज्या मुहूर्तावर प्रारंभ केला तो मुहूर्त म्हणजे गोपाष्टमी उत्सव होय.
 आज सकाळी विठ्ठल रूखमाई मंदिर साकत येथुन दिंडी निघाली दिंडीच्या पुढे सजलेल्या गोमाता चालत होत्या
                      ADVERTISEMENT  
   श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड संचलित श्री साकेश्वर गोशाळेत ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांचा किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता सकाळी गो मातेचे पुजन व आरती, दिंडी सोहळा यानंतर ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे किर्तन झाले किर्तनानंतर जामखेड तालुका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे महाप्रसाद सेवा देण्यात आली यासाठी पिण्याच्या पाण्याची शिवाजी आश्रू कोल्हे यांनी सोय केली. आता दरवर्षी गोपाष्टमी निमित्त गायींचे पुजन मिरवणूक व किर्तन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती श्री साकेश्वर गोशाळेचे चालक आजीनाथ महाराज यांनी सांगितले.
           चौकट
जामखेड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात दिपावलीत धार्मिक व ऐतिहासिक स्थळांवर मशाली लावण्यात आल्या कोरोना काळात अनेक गोरगरीब कुटुंबांना जेवन देण्याचे काम केले, ऐतिहासिक खर्डा किल्ला स्वच्छता मोहीम भगवान शंकराच्या मुर्तीची स्वच्छता असे अनेक उपक्रम राबविले जातात आज किर्तनानंतर देशसेवा करणार्‍या फौजीचा सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here