भर पावसात भिजत प्रा. राम शिंदेंनी गाजवली सभा – खासदार विखेही भिजले..

0
294
जामखेड न्युज – – – – – 
पावसात झालेल्या सभेमुळे अनेकांना लाॅटरी लागली तर विरोधकांचे पानिपत झाले हा इतिहास साक्षी असतानाच आस कर्जत मध्ये माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. राम शिंदे यांचे भाषण सुरु आसतानाच मुसळधार पाऊस सुरू झाला त्यांनी आपले भाषण सुरुच ठेवले  शेजारी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील हेही मुसळधार पावसात भिजले तसेच समर्थकही पावसात भिजत जोशात दिसत होते.
                       ADVERTISEMENT
 
    पावसातली सांगलीची सभा आणि राष्ट्रवादीला मिळालेली उभारी यात सध्याच्या महाविकास आघाडी सरकारचा पाया रचला!! एवढेच नव्हे तर कर्जत-जामखेड चे भाजपचे तत्कालीन आमदार, राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा.राम शिंदेंना पण याच पावसाच्या सभेचा फटका बसला, कारण 2019 च्या जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशीपण शरद पवारांच्या कर्जच्या सभेला जोरदार पाऊस झाला, समर्थकांना चिखलात उभे राहून साहेबांचे भाषण ऐकावे लागले, वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यमांचा मंच कोसळला.. एकूण काय तर 2019 च्या पावसात तत्कालीन विद्यमान वाहून गेले अर्थात सत्तेच्या बाहेर गेले आणि पावसात रोवून उभे राहिलेले सत्तेत आले!!
                           ADVERTISEMENT  
आता हा योगायोग असेल, पण जर राजकीय विश्लेषक जर या सभा आणि पावसाला महत्व देत आले असतील तर पुन्हा एकदा दिवाळीत पाऊस पडतोय, सभा सुरू आहे.. फक्त या पावसात कर्जत मध्ये माजीमंत्री राम शिंदे ओलेचिंब होऊन भाषण ठोकत आहेत, कर्जत-जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांना आडेहात घेत आहेत, जोडीला शेजारी नगर दक्षिणचे भाजप खा.डॉ.सुजय विखे पावसाच्या मुसळधार धारा अंगावर घेत शेजारी मंचावर उभे आहेत.. आणि या पावसाच्या सरीत न्हाऊन उभे राहिलेले समर्थक जोशात आहेत.. आता पावसाची ही ‘नांदी’ पाहिल्यावर निश्चितच म्हणावे लागेल ‘साहेब’ सावधान!!
                    ADVERTISEMENT  
नुकतेच पवार साहेबांच्या सांगलीतील  सभेच्या दोन वर्षेपूर्ती बद्दल आ.रोहित पवारांनी उजाळा देत या पावसातील सभा आणि अर्थातच सत्तांतराच्या गोष्टीला अधोरेखित केले. आता अब की बारी है हमारी!! म्हणत राम शिंदेंनी खा.विखेंच्या साक्षीने अचानक आलेल्या पावसात भिजत ‘प्रतिउत्तर’ दिलंय का!! कर्जत संपर्क कार्यालयाचे उद्घाटनच्या निमित्ताने हा योग वरूनराजाने आणला आणि प्राध्यापक साहेब जोशात आले. खासदार ही या पावसात रमले तर समर्थकांनी भर पावसात नव्या जलनांदीचे भुईनळे उडवत घोषणाबाजी केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here