जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात
विलीनीकरण करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी जामखेड एस टी
अगाराच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एन दिवाळीत दुसऱ्यांदा
बंद पुकारला आहे. या बंदला जामखेड येथील भाजप व
मनसे च्या वतीने पाठींबा देण्यात आला. दिवाळीच्या
सणा दिवशीच हा बंद पुकारला आसल्याने प्रवाशांचे
मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले आहेत.
ADVERTISEMENT

एस टी कर्मचाऱ्यांनी मागिल आठ दिवसांपुर्वी संपुर्ण
महाराष्ट्रा बंद ची हाक दिली होती. त्या वेळी शासनाने
काही मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र त्या मागण्यांवर
एस टी कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी एस टी
महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्याची प्रमुख
मागणी आहे व ती मागणी मान्य झाली नसल्याने पुन्हा
जामखेड अगाराच्या कर्मचाऱ्यांनी आज दि४ रोजी
पहाटे पासुन बंद पुकारला आहे. या बंदला भाजप व
मनसे च्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

भाजपच्या वतीने सकाळी जामखेड अगारास कुलुप
ठोकण्यात आले होते. वेळी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष
शरद कार्ले, शहरध्यक्ष बिभिषण धनवडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, अभिजीत राळेभात, महेश मासाळ, मोहन मामा गडदे, प्रविण बोलभट, उद्धव हुलगुंडे, वैभव कार्ले, शिवकुमार डोंगरे उपस्थित होते. काही तासांनी सदर कुलुप पुन्हा उघडण्यात आले मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा
संप सुरूच आहे. पहाटे पासुन एक ही बस अगाराबाहेर
पडली नसल्याने एन दिवाळी सणात प्रवाशांचे मोठ्या
प्रमाणात हाल झाले.
ADVERTISEMENT 

भाजप बरोबर मनसे देखील संप
करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन भावना जाणुन
घेतल्या व पाठींबा दिला. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष
प्रदीप टापरे, मनसे नेते हवा सरनोबत, सनी सदाफुले,
नितीन सपकाळ, बिभिषण कदम, गणेश पवार, बालाजी
भोसले, आकाश साठे उपस्थित होते.






