जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
सुमारे दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद होती तसेच महामंडळाच्या बस पण बंद होत्या आता परिसरातील कोरोनाची परिस्थिती बर्यापैकी निवळली आहे. शाळा व महाविद्यालये पण सुरू झालेली आहेत विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ताबडतोब बस सुरु करावे असे निवेदन बावी ग्रामपंचायतच्या वतीने जामखेड आगारप्रमुखांना देण्यात आले आहे.
झिक्री, खांडवी, बावी, फक्राबाद, हळगाव, पिंपरखेड, चोंडी येथील विद्यार्थी व नागरीकांसाठी जामखेड ते चापडगाव मुक्कामी तसेच या मार्गी सिद्धटेक पुणे बस सुरू करण्यात यावी अशी मागणी आगार प्रमुख महादेव शिरसाठ यांच्या कडे करण्यात आली यावेळी बावीचे सरपंच निलेश पवार पाटील, फक्राबादचे सरपंच विश्वनाथ राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरीकांची अडचण लक्षात घेता लवकरात लवकर बस सुरू करण्यात येईल असे आगारप्रमुख शिरसाठ साहेबांनी सांगितले याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांनी बसचाच प्रवासासाठी वापर करावा जेणे करूण महामंडळाचे उत्पन्न वाढेल व पुर्वीप्रमाणे सर्व बस सुरू होतील. शिरसाठ साहेब