जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
शिक्षण परिषदेमध्ये केंद्रातील शिष्यवृत्ती परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल पांडववस्ती शाळेतील वैशाली गुंजेगावकर व किशोर राठोड तसेच भुतवडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बळीराम जाधव यांना शैक्षणिक दिपस्तंभचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच श्री साकेश्वर विद्यालय साकत येथिल शिक्षक व पत्रकार सुदाम वराट यांना राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आज नविन मराठी शाळेत माहे आॅक्टोबर च्या शिक्षण परिषदेत सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रप्रमुख पांडुरंग मोहळकर साहेब, मुख्याध्यापक सुरेश मोहिते, संदिप ओझा, तय्यब शेख, मल्हारी पारखे, भगवान समुद्र, राजकुमार थोरवे, उदयकुमार दाहितोडे, अशोक घोलप, जाहेद बागवान, बाजीराव गर्जे, कावळे, नागरगोजे यांच्या सह अनेक शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तालुक्यातील पांडववस्ती शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के यश संपादन केले आहे. तसेच बळीराम जाधव यांनी लाॅकडाउन काळात विविध शैक्षणिक साहित्य तसेच शाळेच्या व गावातील भिंतीवर अभ्यासक्रमाचे लेखन करून शैक्षणिक प्रकिया चालूच ठेवली तसेच विविध शैक्षणिक अॅप, युट्यूब लाईव्ह द्वारे शाळेतील व राज्यातील मुलांना मोफत शिक्षण दिले या कार्याची दखल घेत शैक्षणिक दीपस्तंभ समुहाने दखल घेत त्यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरव केला.

सुदाम वराट यांची नुकतीच जामखेड तालुका पत्रकार संघटनेच्या खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल तसेच माध्यमिक शिक्षक संघटनेच्या सहसचिवपदी निवड व नुकताच राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना केंद्रप्रमुख पांडुरंग मोहळकर साहेब म्हणाले की, प्रत्येक शाळेने पांडव वस्ती शाळेचा आदर्श घेऊन आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र होतील यासाठी प्रयत्न करावेत जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात असे आवाहन केले व सर्वाना शुभेच्छा दिल्या.