जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जे प्रश्न कोर्टाकडून सुटू शकत नाहीत ते संघटनेच्या माध्यमातून सुटतात संघटनेत शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे असते तसेच तळमळीने व एकोप्याने काम केल्यास प्रश्न सुटू शकतात. संघटनेत काम करताना आपल्या विरोधकांचेही काम केले तर खरी पदाला किंमत आहे. सध्या संघटनेत मोठ्या प्रमाणावर विस्कळीत पणा व मतभेद वाढलेले आहेत त्यामुळे अधिकारी वर्गावर संघटनेचा दबाव राहिलेला नाही असे मत शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढाळे यांनी व्यक्त केले
आज दिनांक. २० बुधवार रोजी जामखेड तालुका टिडीएफ व माध्यमिक शिक्षक संघटनेची सहविचार सभा ल. ना. होशिंग विद्यालयाच्या ए. पी. जे अब्दुल कलाम सभागृहात संपन्न झाली यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भगवान मडके, टिडीएफ अध्यक्ष श्रीधर जगदाळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप ढवळे, जिल्हा प्रतिनिधी रमेश अडसुळ, पी. टी. गायकवाड, शहाजी वायकर, अनिल देडे, राघवेंद्र धनलगडे, राजकुमार थोरवे, मयुर भोसले, मुकुंद राऊत, रमेश बोलभट, बी. के. राठोड, अर्जुन रासकर, रोहित घोडेस्वार, विशाल पोले, विजय क्षीरसागर, नवगिरे अविनाश, भोसले साईप्रसाद, स्वप्नील जाधव, मोहन यादव, सुरज गांधी, रघुनाथ मोहळकर, निलेश भोसले, सुभाष बोराटे, सुर्यकांत कदम, बाबू शिंदे, पप्पू गाडे, रामकृष्ण हाके, सुग्रीव ठाकरे, किशोर कुलकर्णी, दत्तात्रय ढाळे यांच्या सह अनेक मान्यवर शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव ढाळे म्हणाले की, संघटनेचे महत्त्व खुप मोठे आहे. आपल्या क्षेत्रात आपण आपले प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवून करू शकतात.
आगोदर संघटनेच्या ताकदीवर लोक विधानपरिषदेसाठी निवडून येत होते. आता संघटनेत थोडा विस्कळीत पणा दिसत आहे मात्र संघटनेच्या माध्यमातून एकत्र या व आपले प्रश्न सोडवून घ्या असे आवाहन केले.
यावेळी टिडीएफ व माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या त्या पुढीलप्रमाणे आहेत.
माध्यमिक शिक्षक संघटना कार्यकारिणी
अध्यक्ष – पी. टी. गायकवाड,
उपाध्यक्ष – सुर्यकांत कदम, रघुनाथ मोहळकर
सचिव – रमेश बोलभट
सह सचिव – सुदाम वराट, मोहन यादव,
टिडीएफ संघटना
अध्यक्ष – दिलीप ढवळे,
उपाध्यक्ष – दत्तात्रय ढाळे, अनिल देडे
सचिव – भरत लहाने
सह सचिव – विशाल पोले, कैलास बिरंगळ
खजिनदार – सुग्रीव ठाकरे
इतर कार्यकारी सदस्य निवडी तालुका पदाधिकारी लवकरात लवकर करणार आहेत.






