विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना 1805 टॅबचे वाटप – विद्यार्थ्यांनी मानले शासनाचे आभार

0
180
जामखेड न्युज – – – 
 इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या इयत्ता 9 वी ते 12 वीत शिकणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बहुशैक्षणिक उद्देशाने 1805 टॅबचे वाटप करण्यात आले. अहमदनगरचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले.
राज्यात मार्च 2020 पासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू होते. यात काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नसल्यामुळे शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. याची शासनाने तात्काळ दखल घेत अहमदनगर जिल्हयातील 8 माध्यमिक व 4 उच्च माध्यमिक आश्रमशाळांना टॅबचा पुरवठा केला.
विद्यार्थ्यांना नवेकोरे टॅब मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
 शासनाने दिलेल्या या टॅबमूळे आनंददायी शिक्षण घेणे शक्य होणार आहे. त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहात. अशा भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here