सुरक्षिततेसाठी व कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक – मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते

0
266
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड शहरातील व  तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी आगामी काळातील सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जामखेड नगरपरिषदेच्या वतीने विविध प्रकारे विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे.
  त्यानुसारच आज दि. ११ रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड १९ चे नियम पाळण्यासाठी व्हाईस रेकॉर्डिंगव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. यानुसारच सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर करणे, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे तसेच लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. अशी जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार १८ वर्षांवरील सर्व नागरिकांनी सक्तीने लसीकरण करून घ्यावे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणात आपल्या जवळच्या माणसांचा मृत्यू होताना पाहिले आहे. आरोग्य तज्ञांच्या मते येणारी तिसरी किंवा तशाच प्रकारच्या येणाऱ्या लाटा येऊ द्यायच्या नसतील तर लसीकरण करून घेणे हा खुप प्रभावी पर्याय आहे.
लसीकरणामुळे आपण कोरोनाचा गंभीर परिणाम व त्यामुळे होणारा मृत्यू टाळू शकतो. यासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात दररोज लसीकरण करण्यात येत आहे. तसेच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणीही नागरिकांनी  आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जामखेड नगरपरिषदचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here