जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – -(सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील नाहुली येथील २५ वर्षीय विवाहिता आपल्या ४ वर्षाच्या मुलासह दि. ४ आॅक्टोबर रोजी घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे. सगळीकडे शोघ घेऊनही ती अद्यापपर्यंत घरी न परतल्याने शांतीलाल बहिर यांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड पोलीस स्टेशनला ती महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय धामणे हे करीत आहेत.
दिपाली शांतीलाल बहिर व संभाजी शांतीलाल बहिर अशी हरवलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. दिपालीचे वर्णन उंची १५२ सेमी, रंग गोरा, मजबूत बांधा, सरळ नाक अंगावर लाल केसरी रंगाची साडी, मुलगा उची उंची २.५ इंच, अंगावर जिन्स, पांढरा शर्ट, असे वर्णन आहे. कोणाला आढळून आल्यास किंवा माहीती मिळाल्यास पोलीस स्टेशन जामखेड येथे 02421-221033 किंवा पोलीस नाईक संजय धामणे 8080037521 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन जामखेड पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.