अकोला जिल्हा परिषदेवर वंचितचा झेंडा!!! जामखेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पेढे वाटत ढोलताशांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा

0
252
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
        अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये अभूतपूर्व यश संपादन केल्यामुळे भटके-विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक ॲड. डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
      यावेळी ॲड.डॉ.अरुण जाधव जामखेड न्युजशी बोलताना म्हणाले की, अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील मिळविलेले हे अभूतपूर्व यश या राज्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्ष्यांना धडकी भरवणारे यश आहे. काही महिन्यातच राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुका लढवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच सर्वसामान्यांच्या विचाराचे राज्य येण्याचे संदेश आपल्याला मिळत आहेत. पुढील काळात वंचित बहुजन आघाडी शिवाय राज्यांमध्ये कोणीही सत्ता स्थापन करू शकणार नाही. हे सर्व बलाढ्य पक्षांच्या लक्षात आलेले आहे.
     आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती मधिल बहुमत हे सर्वसामान्यांच्या विचाराची सत्ता आहे. हा पक्ष सर्व बाराबलुतेदार व आलुतेदार व वंचित घटक यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला या यशाचा खूप खूप आनंद होत आहे.
       आज जामखेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पेढे वाटून आणि फटाके वाजवून हा जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच विजयाची जल्लोष रॅली खर्डा चौक ते कुंभारतळे या ठिकाणा पर्यंत अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडी, जामखेड तालुका अध्यक्ष अतिश पारवे, तालुका उपाध्यक्ष गणेश घायतडक, तालुका शहर अध्यक्ष दत्ता समुद्र, तालुका प्रमुख सल्लागार मच्छिंद्र जाधव, शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, शहर उपाध्यक्ष सुधीर कदम,शहर उपाध्यक्ष विशाल जाधव, वडार समाजाचे नेते मल्हारी गायकवाड, मोहन शिंदे, मोहन चव्हाण, संतोष चव्हाण, अजय जाधव, शुभम जाधव,राकेश जाधव, अभिषेक जाधव, नितीन जाधव, गणेश जाधव, संदिप जाधव, विशाल समिंदर, सोनू जाधव, गणेश भोलभट, किरण जाधव,सागर जाधव, राकेश साळवे, सचिन भिंगारदिवे, राजू शिंदे, कदिर मदारी, सोहेल मदारी, अवी जाधव, खुशाल शेगर, रवींद्र जाधव, अनिकेत जाधव, गोकुळ माने, संतोष पवार, कृष्णा जाधव, सर्जेराव पाटील, अतिश जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here