जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यात आज अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला यामध्ये सोयाबीन पिकांची काढणी असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे शेतातच पीक सडून चालले आहे. पिपंळगाव आळवा येथे आज दि . ९ ऑक्टोबर रोजी दु .१.०० च्या दरम्यान उत्तम लक्ष्मण मोहीते याचा बैल विज पडल्याने जाग्यावरच मरण पावला दुसरी कोणतीही जीवीत हाणी झालेली नाही सदर बैलाचा पंचानामा करण्यात आला असून त्याची किंमत ५५०००।– एवढी आहे. तलाठी सुखदेव कारंडे यांनी पंचासमक्ष पंचनामा केला.
सततच्या पावसामुळे पीके चालली सडून

तालुक्यात गेल्या आठवडाभरा पासून पावसाच्या जोरदार हजेरीने तालुक्यात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहेत. मागील आठवड्यात जातेगाव मधील पुलावरून नदीत पडल्याने बैल व एक गाई चा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे तालुक्यातील सर्वच तलाव, मध्यम प्रकल्प पूर्ण ओव्हर फ्लो झाल्याने तालुक्यातील बहुतांश नद्या दुतर्फा वाहत आहेत.त्यामुळे जोरदार पाऊस झाला की सर्वच पाणी नदीला येत असल्याने पूर परिस्थिती निर्माण होत आहे.त्यामुळे काही गावांचा संपर्क सतत तुटत आहे.
शेतकऱ्यांनी पावसात जताताना खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, सद्या पावसाचा जोर असून नदी जवळील राहणाऱ्या व सतत पाऊस असल्याने नदीला पूर येत आहे तरी पुलावर पाणी असल्यावर त्यावरून ये जा करू नये, तसेच पाऊस चालू असताना पावसात वीज कडकडाट सुरू बाहेर जाणे टाळावे असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.






