माझी वसुंधरा अभियानानिमित्त पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी वृंद व ग्रामसेवकांनी राबवली खर्डा गावात स्वच्छता मोहीम…

0
209
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – –  (सुदाम वराट) 
भारतातील सर्वात उंच भगवा ध्वजाची उभारणी विजयादशमीच्या मुहूर्तावर खर्डा (शिवपट्टण) किल्ल्यासमोर होत आहे. यासाठी देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्या दृष्टीकोनातून स्वच्छ खर्डा सुंदर खर्डा मोहिमेंतर्गत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियानांतर्गत खर्डा शहरात स्वच्छता अभियान राबवत किल्ला परिसर व गावात
अधिकारी कर्मचारी व ग्रामसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली यामुळे खर्डा परिसर चकाचक झाला आहे.
       पंचायत समिती जामखेड चे कर्तव्य दक्ष गटविकास अधिकारी प्रकाशजी पोळ यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत खर्डा येथे माझी वसुंधरा अभियान व स्वराज ध्वज उभारणी सोहळा  या दोन्ही  कार्यक्रमाच्या अनुषंगानं ग्रामपंचायत खर्डा परिसर व किल्ला परिसरा मध्ये चालू असलेल्या स्वच्छता  मोहिमे मध्ये पंचायत समिती कार्यालयातील कार्यरत असणारे सर्व कार्यालयीन प्रमुख , कर्मचारी व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक बांधव यांनी उपस्थित राहुन स्वच्छता मोहिमे मध्ये सहभाग घेवून सकाळी आठ वाजल्या पासून साडे अकरा वाजेपर्यंत एस.टी स्टँड परिसर व किल्ला परिसर येथील स्वच्छता करण्यात आली.. तसेच खर्डा शहरांमध्ये स्वच्छते संदर्भात रॅली काढण्यात आली.
       या उपक्रमात गावातील महिलांचा उस्फुर्त सहभाग होता. आजच्या स्वच्छता  मोहिमे मध्ये वार्ड क्रमांक तीन मधील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पंचायत समिती चे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, तालुका कृषी अधिकारी अशोक शेळके, विस्तार अधिकारी बापूसाहेब माने,  साळवे साहेब, कैलास खैरे, भजनावळे साहेब व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनात गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे व ग्रामपंचायत सदस् मदन गोलेकर, महालिंग मोरे , प्रकाश गोलेकर, अशोक खटावकर, सुग्रीव भोसले,  दादा जावळे ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी सहभागी होते.
या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते व ग्रामसेवक युवराज पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here