जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे पर्यटनस्थळ व धार्मिक स्थळ
श्री क्षेत्र रामेश्वर सौताडा हे पर्यटन तसेच धार्मिक ठिकाण असून या ठिकाणी हेमाडपंतीच्या ही आधीचे सुंदर असे दगडी मंदिर ,सोळखांबी सभामंडप, सुंदर नक्षीकाम असलेल्या अनेक वीरगळ, पाचशे फुटांवरून पडणारा धबधबा आणि शिलालेख उपलब्ध आहे. मुख्यत्वे दोन शिलालेख या ठिकाणी आहेत. एक शिलालेख उर्दू आणि दुसरा संस्कृत असावा असे दिसते. दरीत खाली उतरताना पायऱ्या सुरू होताच डाव्या हाताला उर्दू संगमरवरी शिलालेख दगडाच्या ढाच्यात पर्यटकांना पाहण्यासाठी उभा होता. पण चार महिन्यांपूर्वी अज्ञात १० ते १२ माथेफिरू मुलांनी तो ढकलून पाडला त्याचे २-३ तुकडे झाले. रोहन शिंदे या रामेश्वर भक्तांच्या अथक परिश्रमाने शिलालेखाचे मराठीत भाषांतर करण्यात आले आहे.

हा वारसा पुढच्या पिढ्यांना पाहता यावा, त्यासाठी त्याचे जतन आणि संवर्धन महत्वाचे त्या अनुषंगाने गेली चार महिने मंदिर समितीचे, भगवान श्री रामेश्वराचे सेवक हभप. रोहन विठ्ठल शिंदे सौताडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारी डॉ.अली अब्बास सर (MA,Ph.D)समन्वयक उर्दू विभाग ,पंजाब उर्दू विद्यापीठ, चंदीगड यांच्या अथक प्रयत्नातून जीर्ण व ओबडधोबड अशा शिलालेखाचे मराठीत भाषांतर करणे शक्य झाले. तसेच वन परिक्षेत्र आष्टी, पुणे विद्यापीठाचे ही मार्गदर्शन मिळाले. शिलालेख हा हिजरी १३१४ चा असून शिलालेखात मंदिर व परिसराची माहिती आहे. पुढच्या पिढीला हा अमूल्य ठेवा जतन ठेवण्यासाठी भाषांतर हे एक मोठं पाऊलं करलेलं आहे या नंतर ह्याचा जीर्णोद्धार होऊन लवकरच नवीन स्वरूपात भाविकांना पाहायला मिळो हीच सर्व भाविकांची आणि पर्यटकांची ईच्छा, आणि लवकरच ही ईच्छा पूर्ण होवो हे भगवान रामेश्वरा चरणीं साकडं भाविक भक्तांनी घातले आहे.
जामखेड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्य़ातील सौताडा हे ठिकाण पर्यटनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात येथिल निसर्ग मोठा खुललेले दिसतो. उंचावरून खोल दरीत कोसळणारी धार, गर्द झाडी, शेजारी वनविभागाने केलेला बगिचा दरीत सुंदर असे रामेश्वर मंदिर धबधब्याजवळ शेजारी वेदांत महाविद्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पंडित तयार होतात. जामखेड पासून जवळ असणाऱ्या या ठिकाणी पुरातन शिलालेख सापडला व तो रोहन शिंदे या भक्ताच्या प्रयत्नातून ऊर्दू भाषेचे मराठीत भाषांतर करण्यात आले आहे. लवकरच या शिलालेखाचा जिर्णोद्धार होऊन अमूल्य ठेवा पुढच्या पिढीसाठी उपलब्ध होणार आहे.






