माजी विद्यार्थी कलावंतांचा ल. ना. होशिंग विद्यालयातर्फे सत्कार

0
292
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
 विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या आपले नावलौकिक विविध क्षेत्रात आपल्या कलेने ठसा उमटवणाऱ्या माजी विद्यार्थी पत्रकार धनराज भगतसिंग पवार व चित्रकार अनिल संभाजी खेत्रे दोघांचाही विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     पत्रकार धनराज पवार यांना पत्रकार क्षेत्रातील निर्वाण फाउंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल पत्रकार धनराज पवार यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला.तसेच चित्रकार अनिल संभाजी खेत्रे यानेही शाळेविषयी आपण काहीतरी देणे लागतो सामाजिक भान ठेवून शाळेमध्ये एनसीसी विभागाची विनामूल्य सजावट करून दिली. त्याबद्दल चित्रकार अनिल संभाजी खेत्रचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य श्रीकांत होशिंग अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थिती उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे पर्यवेक्षक रमेश अडसुळ उपस्थित होते.
पत्रकार धनराज पवार चित्रकार संभाजी खेत्रे यांचा प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे व पर्यवेक्षक रमेश अडसूळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अमित गंभीर महाराष्ट्र बेकरी संचालक यांचाही सत्कार शाळेच्या वतीने प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या हस्ते करण्यात आला.
प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये पत्रकार धनराज पवार व चित्रकार अनिल खेत्रे दोघांनीही अतिशय खडतर परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून दोघांनीही पत्रकारिता व चित्रकारिता क्षेत्रांमध्ये प्रामाणिकपणे काम करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे.त्यांच्या कामामुळे त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार होत आहे. शाळेचे माजी विद्यार्थी असल्यामुळे शाळेला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. दोघांनाही पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करून शाळेच्या व सर्वांच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन केले.
कला शिक्षक मुकुंद राऊत यांनी मनोगतामध्ये त्या दोघांनाही पत्रकारिता व चित्रकारिता आपापल्या क्षेत्रात अजूनही मोठं नाव कमवा व प्रामाणिकपणाची कास सोडू नये आणि सत्कारानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते, कामातील सातत्यामुळे दिवसेंदिवस तुमची प्रगती होवो शाळेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन पुनश्च त्यांचे अभिनंदन केले.
पत्रकार धनराज पवार व चित्रकार अनिल संभाजी खेत्रे या दोघांनीही आपल्या मनोगतामध्ये शाळेविषयी आपुलकीची भावना व्यक्त करून हा आमच्या दृष्टीने सर्वात मोठा सत्कार आहे. सर्वांचा असाच आशीर्वाद असू द्या अशी विनंती करून आमच्या परीने शाळेच्या दृष्टीने काही मदत लागल्यास आम्ही कधीही काम करण्यास तयार आहोत असे सांगून,सत्कार याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी योगशिक्षक बाळासाहेब पारखे, शहाजी वायकर, प्रवीण गायकवाड, ईश्वर कोळी भाऊसाहेब व रामचंद्र होशिंग भाऊसाहेब, बबन राठोड, जगदाळे,विशाल पोले, रोहित घोडेस्वार, सुभाष बोराटे, किशोर कुलकर्णी, विजय शिरसागर, हनुमंत वराट, सुरज गांधी,अविनाश नवगिरे,साई भोसले,अमित सांगळे, स्वप्नील जाधव, विनोद उगले,श्रीमती संगिता दराडे, घायतडक मॅडम,अल्हाट मॅडम,भालेराव मॅडम, बांगर मॅडम, जाधव मॅडम उपस्थित होते
कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन अनिल देडे एनसीसी विभाग प्रमुख यांनी केले. आणि आभार प्रदर्शन समारंभ प्रमुख संजय कदम यांनी केले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here