जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जामखेडच्या वतीने पंचायत समिती जामखेड या ठिकाणी सत्कार करण्यातआला.
आदरणीय गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, जामखेड तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा यासाठी विविध उपक्रम करून जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा स्पर्धात्मक परीक्षेसाठी यशस्वी होईल त्यावेळी आपल्या सर्व तालुक्यातील शिक्षकांच्या मदतीने नियोजन तयार करू असे त्यांनी सांगितले
त्याप्रसंगी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी प्रकाश पोळ यांचा सत्कार केला. तसेच आपल्या उपक्रमास सर्व शिक्षकांच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
त्यावेळी उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश आडसुळ, योगशिक्षक बाळासाहेब पारखे, शहाजी वायकर, प्रवीण गायकवाड, बबन राठोड, मुकुंद राऊत, अनील देडे, अर्जून रासकर, रोहित घोडेस्वार समारंभ प्रमुख संजय कदम व विशाल पोले उपस्थित होते.