न्यू इंग्लिश स्कूल राजुरी येथे शिक्षणोत्सव साजरा- मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, पाठ्यपुस्तकांचेही वाटप

0
240

जामखेड प्रतिनिधी

             जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
  ग्रामीण भागाचा विचार करता आॅनलाईन पेक्षा प्रत्यक्ष शिक्षण मिळणे आवश्यक आहे कारण विद्यार्थी हा ९० % अनुभवातून शिकतो प्रत्यक्ष शिक्षणात अनुभव मिळतो तसेच शिक्षक व विद्यार्थी संवाद चांगल्या प्रकारे होत असतो यातुनच व्यक्तीमत्वाचा विकास होतो असे मत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
      दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल राजुरी येथे शिक्षणोत्सव समारंभ, पाठ्यपुस्तके वाटप व नवनियुक्त सचिव शशिकांत देशमुख यांचा व नुकताच राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्युलफुकार पठाण यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून देशमुख बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, हभप नारायण महाराज दौंड, सरपंच गणेश कोल्हे यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
      आज शाळेचा पहिला दिवस असल्याने शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल शशिकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात तसेच न्यू इंग्लिश स्कूल राजुरीचे मुख्याध्यापक ज्युलफुकार पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्युलफुकार पठाण यांनी केले यावेळी ते म्हणाले की, सर्वच शिक्षकांनी शाळा बंद आसताना आॅनलाईन काम चांगल्या प्रकारे केले शाळेबद्दल गोडी निर्माण केली यामुळे आज पहिल्या दिवशी १६० विद्यार्थी हजर आहेत.
    ल. ना होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग म्हणाले की, अद्यापही कोरोना गेलेला नाही तेव्हा सर्वांनीच कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यावेळी हभप दौंड महाराज यांनीही शुभेच्या दिल्या
  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कैलास वराट यांनी केले तर आभार दिनानाथ शिंदे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here