Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या कोरोना नियमांचे पालन करून प्रार्थनास्थळे उघडणार- तीन दिवसात हमीपत्र द्यावे लागणार

कोरोना नियमांचे पालन करून प्रार्थनास्थळे उघडणार- तीन दिवसात हमीपत्र द्यावे लागणार

0
184
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
  शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम व सुचनांचे पालन करून जिल्ह्य़ातील मंदिरे व प्रार्थनास्थळे उघडी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी संदीप निचीत यांनी या बाबत नुकताच आदेश जारी केला आहे.
      जिल्ह्य़ात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. तसेच संबंधितांकडूनही मंदिर व प्रार्थनास्थळे उघडी करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात येत होती. या सर्व बाबींचा विचार करून दि ७ आॅक्टोबर पासून मंदिरे व प्रार्थनास्थळे उघडी करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
       मात्र ज्या मंदिर किंवा प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी होते. त्या ठिकाणच्या विश्वस्त मंडळाचे अधिकारी व पदाधिकारी यांचेकडून कोविड १९ (कोरोना) बाबत शासनाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन होणार नाही. तसेच कोरोना प्रतिबंधक उपाय योजना जसे की, सोशल डिस्टन्स, मास्कचा व सॅनिटायजरचा वापर तसेच वेळेबाबत ‘हमीपत्र’ घेणेबाबत तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना नुकताच आदेश प्राप्त झाला असून, तालुक्यातील जास्त संख्येने भाविक जमा होणाऱ्या धार्मिक किंवा प्रार्थनास्थळांचे ट्रस्ट, बोर्ड, आस्थापना यांचेकडून दि. ४ आॅक्टोबर २०२१ पर्यंत हमीपत्र प्राप्त करून घेणेबाबत जिल्ह्य़ातील सर्व तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत.
        त्याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील ज्या मंदिर किंवा प्रार्थनास्थळांमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी किंवा प्रार्थनेसाठी एकत्र येतात अशा आस्थापना, ट्रस्ट किंवा बोर्डाचे अधिकारी किंवा अध्यक्ष यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी दिलेल्या आदेशानुसार ‘हमीपत्र’ करून द्यावे असे आवाहन तहसीलदार तथा तालुकाआपत्ती व्यवस्थापन अधिकारी योगेश चंद्रे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!