जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरासह तालुक्यात आरोग्य विभाग, नगरपरिषद व आ.रोहित दादा पवार यांच्या विशेष प्रयत्नातून बुधवार व गुरूवार दि २९ व ३० रोजी मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. त्या मोहिमेत सहभागी होऊन कोरोनाला हद्दपार करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी यांनी केले आहे.
तरी १८ वर्षावरील एकही नागरिक कोरोना लसीपासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे.
जामखेड शहरात पुढील ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.
१) ग्रामीण रुग्णालय
२) बस स्टँड
३)ऊर्दू शाळा(खर्डा चौक)
४)शनी मंदिर(मेन पेठ)
५) डॉ. आंबेडकर सभागृह(आरोळे वस्ती)
६)मारुती मंदिर(तपनेश्वर रोड)
७) समाज मंदिर, जमादारवाडी.
वरील ठिकाणी आमदार रोहित ( दादा) पवार यांच्या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणात लसीकरण उपक्रम राबविण्यात येणार आहे.आधार कार्ड आवश्यक आहे.तरी सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी यांनी केली आहे.