दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार; खासदार डॉ. सुजय विखे-पाटल

0
190
जामखेड न्युज – – – 
राज्यामध्ये दिवाळीनंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येणार आहे. असं भाजपचे युवा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कर्जत पंचायत समिती मध्ये आढावा बैठकीत बोलताना म्हटलं आहे. या आढावा बैठकीमध्ये नागरिकांनी अनेक प्रश्न आणि समस्या सुटत नसल्याबद्दल तक्रारी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समोर मांडल्या यावेळी या तक्रारीला उत्तर देताना खासदार विखे म्हणाले की, दिवाळीनंतर आपल्या विचाराचे सरकार सत्तेवर येणार आहेत. यामुळे त्यावेळी तुमचा कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही.
त्यामुळे थोड्या दिवस थांबा महाराष्ट्रात सत्ता बदल होणार असा सूचक इशारा खासदार सुजय विखे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी कागदावरच
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत 72 हजार कोटी रुपये वाटले आहेत. मात्र, दुसरीकडे राज्य सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित पैसे भरणाऱ्यांना .50000 हजार रुपये विशेष सवलत जाहीर केली परंतु ती केवळ कागदावरच राहिली असून राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा बोजवारा उडाला आहे. अशी राज्यातील आघाडी सरकारवर टीका भाजपचे युवा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कर्जत येथे बोलताना केली.
भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आज कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी प्रतिबंधक लसीकरण मोहीम याचा आढावा घेतला आणि त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सर्व विभागाच्या समस्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी अजित थोरबोले, नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश कुराडे, वन विभागाचे अधिकारी केदार मुख्याधिकारी गोविंद जाधव, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, प्रकाश शिंदे, काकासाहेब धांडे, विनोद दळवी, काकासाहेब ढेरे, आशा वाघ, मंदा होले, राजश्री थोरात, सुनील यादव, डॉक्टर राऊत, युवराज शेळके, बापूराव गायकवाड, सुनील काळे, नवनाथ तनपुरे, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते
कोरोना मोफत लस
यावेळी बोलताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी शेतमजूर महिला पुरुष विद्यार्थी युवक यांच्यासाठी विविध योजना देशांमध्ये राबविल्या आहेत. संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये नागरिकांसाठी कोरोनाची प्रतिबंधक लस पंतप्रधान यांनी उपलब्ध करून दिली आहे व ती यशस्वी राबवली जात आहे. या प्रतिबंधक लस मुळे अनेकांची जीव वाचले आहे.
लसीकरण प्रमाण काही भागात अतिशय कमी
नगर जिल्ह्यामध्ये अतिशय व्यवस्थित आणि योग्यरीत्या वैद्यकीय अधिकारी व सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्यामुळे सुरू आहे. मात्र काही गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे ही बाब चिंताजनक आहे. यामुळे आजच्या आढावा बैठकीत प्रत्येक गावाचा लसीकरणाची टक्केवारी पाहण्यात येत असून ज्या ठिकाणी लसीकरण प्रमाण कमी आहे. त्या ठिकाणी विशेष मोहीम आरोग्य विभागाच्या मार्फत राबविली जाणार असून 15 सप्टेंबर पर्यंत सर्व गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सारखे झालेले असेल. यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचंही त्यांनी बोलतांना म्हटलं आहे.
गोरगरिबांना मोफत धान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळामध्ये स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना गेल्या एक वर्षांपासून मोफत धान्य पुरवठा केलेला आहे. यामुळे कोरोनाच्या संकटात एकही गरीब माणूस उपाशी राहणार नाही. याची काळजी घेण्यात आली आहे. असं देखील सुजय विखे यांनी स्पष्ट केलंय.
पंतप्रधान आवास योजना
देशातील ग्रामीण व शहरी भागामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गरीब व्यक्तीला घर देण्यात आले आहे. यामध्ये 70 टक्के निधी हा केंद्र सरकारचा आहे आणि हा निधी पालिका व ग्रामपंचायत यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे. उर्वरित राहिलेली निधी हा राज्य सरकारचा असून तो दिला जात नाही यामुळे काही जण केंद्र सरकारला विनाकारण बदनाम करतात परंतु केंद्र सरकारने आपला निधी पूर्णपणे दिलेला आहे. यावेळी त्यांनी या सर्व योजना मध्ये कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अडचणी व तक्रारींचा आढावा घेत ते प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here