Monday, November 16, 2026
Home राजकारण बॅन्ड युद्ध नको, जामखेडला पाणी द्या! नेत्यांनो, टोलेबाजी थांबवा, आधी रस्ते आणि...

बॅन्ड युद्ध नको, जामखेडला पाणी द्या! नेत्यांनो, टोलेबाजी थांबवा, आधी रस्ते आणि पाणीप्रश्न सोडवा – जनतेचा थेट सवाल!

0
2
बॅन्ड युद्ध नको, जामखेडला पाणी द्या! नेत्यांनो, टोलेबाजी थांबवा, आधी रस्ते आणि पाणीप्रश्न सोडवा – जनतेचा थेट सवाल!

जामखेड न्युज – – – – – 

बॅन्ड युद्ध नको, जामखेडला पाणी द्या! नेत्यांनो, टोलेबाजी थांबवा, आधी रस्ते आणि पाणीप्रश्न सोडवा – जनतेचा थेट सवाल!

 

कर्जत-जामखेडच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक युद्धाला तोंड फुटले असून, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात ‘बॅन्ड’वरून राजकीय सामना रंगला आहे.

दीपावली सन्मान सोहळ्यात बोलताना प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत, कुठेही आंदोलन असले की रोहित पवार बॅन्ड वाजवायला हजर असतात, मात्र स्वतःच्या मतदारसंघातील प्रश्नांकडे त्यांनी लक्ष द्यावे, असा टोला लगावला. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या प्रश्नात त्यांचा काय संबंध, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिंदेंच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार राम शिंदेंच्या पराभवाचा तिसऱ्यांदा बॅन्ड वाजवतील, असा पलटवार पक्षाकडून करण्यात आला.

राजकीय टोलेबाजी आणि एकमेकांचा बॅन्ड वाजवण्याच्या स्पर्धेत नेत्यांनी कितीही राजकारण करावे; मात्र सर्वसामान्य जनतेचा सवाल एकच आहे – कोणी कोणाचा बॅन्ड वाजवा, पण आधी जामखेडचा पाणीप्रश्न सोडवा! तहानलेल्या जनतेला राजकीय आरोप-प्रत्यारोप नकोत, तर नियमित पाणीपुरवठा हवा आहे.

तसेच रखडलेले रस्ते, खड्डेमय मार्ग आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावा. नेत्यांच्या भाषणांचा आवाज नको, विकासकामांचा आवाज ऐकू द्या; कारण जनतेला बॅन्डच्या राजकारणापेक्षा पाणी आणि चांगले रस्ते महत्त्वाचे आहेत!

एकीकडे शिंदेंचा बोचरा टोला, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा आक्रमक पलटवार, यामुळे कर्जत-जामखेडचे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आगामी काळात या ‘बॅन्ड युद्धा’ची राजकीय रंगत आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!