Saturday, November 7, 2026
Home राजकारण कर्जत-जामखेडला हिणवणाऱ्यांना आता इथेच यावे लागले! राम शिंदेंचा विरोधकांना जोरदार टोला, घुमरेंच्या...

कर्जत-जामखेडला हिणवणाऱ्यांना आता इथेच यावे लागले! राम शिंदेंचा विरोधकांना जोरदार टोला, घुमरेंच्या पदग्रहणाने सहकारात नवा इतिहास! राळेभात पर्वाला पूर्णविराम, घुमरे पर्वाचा श्रीगणेशा! जामखेडच्या सहकारात ऐतिहासिक घडामोड

0
2
कर्जत-जामखेडला हिणवणाऱ्यांना आता इथेच यावे लागले! राम शिंदेंचा विरोधकांना जोरदार टोला, घुमरेंच्या पदग्रहणाने सहकारात नवा इतिहास!  राळेभात पर्वाला पूर्णविराम, घुमरे पर्वाचा श्रीगणेशा! जामखेडच्या सहकारात ऐतिहासिक घडामोड

जामखेड न्युज – – – – – – 

कर्जत-जामखेडला हिणवणाऱ्यांना आता इथेच यावे लागले! राम शिंदेंचा विरोधकांना जोरदार टोला, घुमरेंच्या पदग्रहणाने सहकारात नवा इतिहास!

राळेभात पर्वाला पूर्णविराम, घुमरे पर्वाचा श्रीगणेशा! जामखेडच्या सहकारात ऐतिहासिक घडामोड

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेडने राजकीय ताकद दाखवून दिली आहे. जामखेड विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून सचिन (नाना) घुमरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर जामखेडमध्ये त्यांचा भव्य पदग्रहण सोहळा पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

राळेभातांच्या २० वर्षांच्या वर्चस्वाला धक्का!
जामखेडच्या सहकार क्षेत्रातील राळेभात कुटुंबाचे दोन दशकांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यात प्रा. राम शिंदे यांच्या राजकीय रणनीतीला यश आल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. घुमरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे जामखेडच्या सहकार क्षेत्रात नवे राजकीय समीकरण निर्माण झाले आहे.

यावेळी बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले, “कर्जत-जामखेडला हिणवणाऱ्यांना आता कर्जत-जामखेडमध्ये यावे लागले,” असा सूचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. सचिन घुमरे हा माझा विश्वासू शिलेदार असून जिल्हा बँकेत शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्धार!
पदग्रहणावेळी सचिन घुमरे म्हणाले, “सभापती प्रा. राम शिंदे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा बँकेसारख्या मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी दिली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्ज पुनर्गठन आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार आहे. पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे.”बी.कॉम., एमबीए, एलएलबीपर्यंत शिक्षण घेतलेले घुमरे नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही आहेत.

खर्डा चौकात जल्लोष!
पदग्रहणानंतर खर्डा चौक ते बँक शाखेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात घुमरे यांचे स्वागत करण्यात आले. धामणगावकरांनीही आपल्या लेकाच्या निवडीचा आनंद उत्साहात साजरा केला.

राजकीय वर्चस्वाचा नवा अध्याय सुरू झाला असून आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून जामखेडच्या शेतकऱ्यांचे प्रश्न कितपत मार्गी लागतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!