बॉम्बस्फोटांनी काबूल हादरले 90 ठार 150 जखमी अमेरिकेचे 13 कमांडो ठार व्हाईट हाऊसवर अर्ध्यावर ध्वज

0
239
जामखेड न्युज – – – 
अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर  झालेल्या स्फोटांमुळे 90 जणांचा  मृत्यू झाला असून 150 हून अधिक जण जखमी झालेत. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला आहे. या स्फोटांची जबाबदारी ISIS-K या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. गुरुवारी अमेरिकेनं नागरिकांना काबूल विमानतळावर हल्ला होण्याचा धोका असून विमानतळापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.दरम्यान अमेरिकेचा इशारा खरा ठरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या हल्लाचा तीव्र निषेध केला आहे. या दहशतवाद्यांना आम्ही माफ करणार नसून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल अशा इशारा जो बायडेन यांनी दिला आहे. या हल्ल्यात अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या जो बिडेन यांनी म्हटलं की, आम्ही ही गोष्ट विसरणार नाही आणि आम्ही माफ ही करणार नाही. आता आम्ही शिकार करू आणि त्यांना या मृत्यूंची किंमत मोजावी लागेल.
यासह बायडेन म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानातल्या अमेरिकन नागरिकांना वाचवू. कमीत कमी एक हजार अमेरिकन आणि इतर अन्य अफगाणी अजूनही काबूलमधून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहेत.
ISIS-K नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी गटाने आपल्या टेलिग्राम अकाऊंटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं जाहीर केलं. गुरुवारी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर दोन स्फोटांनंतर काबूलमधील अमेरिकी दूतावासाने अमेरिकी नागरिकांना विमानाचा प्रवास टाळण्यासाठी आणि विमानतळावरील गेट टाळण्यासाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here