जामखेड न्युज – – – – – –
‘पैसे मिळवणे हे आयुष्याचे ध्येय नाही, कलासाधना हेच ध्येय!’ — प्रमोद कांबळे
जामखेडमध्ये मुकुंद राऊत व दीपक तुपेरे यांना ‘कलाभूषण पुरस्कार’, कला शिक्षक संघटनेचा स्तुत्य उपक्रम
“पैसे मिळवणे हे आयुष्याचे ध्येय न ठेवता रोज कलासाधना आणि रियाज करणे महत्त्वाचे आहे. कलाकृती अजरामर असते आणि त्यामुळे कलाकाराची ओळख कायम राहते,” असा प्रेरणादायी संदेश प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी दिला.
प्रमोद कांबळे यांनी आपल्या मनोगतात कलासाधनेचा प्रवास उलगडताना उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. “आजारी असतानाही मी या कार्यक्रमाला आलो आहे. रात्रभर जागून परदेशात चित्र देण्याचे काम केले आणि त्यानंतर जामखेडला आलो. माझ्या घरातील संपूर्ण वातावरणच कलात्मक आहे. बाहेरच्या जगात नोकरीच्या संधी मिळत होत्या; मात्र मी नोकरी केली नाही. पैसे मिळवणे हे आयुष्याचे ध्येय न ठेवता रोज कलासाधना आणि रियाज करतो,” असे त्यांनी सांगितले. जामखेड कला संघटनेने सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले याबद्दल जामखेड टीमचे कौतुक केले

जामखेड तालुका कलाध्यापक संघटना तालुकाध्यक्ष मयुर भोसले यांनी अहिल्यानगर कलाध्यापक व जामखेड कलाध्यापक संघटना संयुक्त विद्यमाने
यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘कलाभूषण पुरस्कार’ योजनेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे मुकुंद राऊत व दीपक तुपेरे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘कलाभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, पुरस्काराची रक्कमही संस्थेला देण्याची भावना या दोन्ही पुरस्कारार्थींनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, हाळपावत मामा, कलाध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पठाडे, दशरथ कोपनर, आप्पा शिरसाट, प्राचार्य दत्तात्रय राजमाने, मुख्याध्यापीका रोहिणी भोर, मुख्याध्यापक भरत लहाने, पी. एल. आवारे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, पी. टी. गायकवाड, उपप्राचार्य युवराज भोसले, मीना राळेभात, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सचिव संतोष पवार, कुंडल राळेभात, मोहन यादव, सुग्रीव वायकर, रमेश चांदेकर, योगेश अब्दुले, बापुराव बांडराव, पोटे सर, संगिता दराडे, त्रिंबक लोळगे, संतोष सरसमकर, डाडर सर, अशोक बोराडे, वस्तारे सर, अरुण हेंद्रे, गर्जे सर, शेख सर, सुरज डाडर, सुनील भाबुंद्रे, बाळासाहेब धनवडे, मोरे सर, फुले सर, अंकुश गवळी, आबा जायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षी होणार ‘कलाभूषण पुरस्कार’
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना जामखेड तालुका कलाध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष मयूर भोसले यांनी सांगितले की, यापुढे दरवर्षी कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना ‘कलाभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे कला क्षेत्रातील गुणवंत, सर्जनशील आणि उपक्रमशील व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



