Home ताज्या बातम्या रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीची नवी टीम सज्ज! डॉ. सादेख पठाण अध्यक्ष,...

रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीची नवी टीम सज्ज! डॉ. सादेख पठाण अध्यक्ष, अरुण उगले सचिवपदी विराजमान सेवेचा झेंडा उंचावणार! रोटरी क्लब जामखेड सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा दिमाखदार पदग्रहण सोहळा

0
6
रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीची नवी टीम सज्ज! डॉ. सादेख पठाण अध्यक्ष, अरुण उगले सचिवपदी विराजमान   सेवेचा झेंडा उंचावणार! रोटरी क्लब जामखेड सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा दिमाखदार पदग्रहण सोहळा

जामखेड न्युज – – – – – 

रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीची नवी टीम सज्ज! डॉ. सादेख पठाण अध्यक्ष, अरुण उगले सचिवपदी विराजमान

सेवेचा झेंडा उंचावणार! रोटरी क्लब जामखेड सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा दिमाखदार पदग्रहण सोहळा

 

रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या सन २०२६-२७ या वर्षातील नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी जामखेड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजसेवा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्याचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे डीजीई क्षितिज झावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एजी रो. हरीष नय्यर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.

यावेळी अध्यक्षपदाची धुरा रो. डॉ. सादेख पठाण यांनी तर सचिवपदाची जबाबदारी रो. श्री. अरुण उगले यांनी स्वीकारली. नूतन पदाधिकाऱ्यांनी रोटरीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी विधायक व सेवाभावी उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.


नूतन कार्यकारिणीमध्ये खजिनदार रो. विकास पवळ, उपाध्यक्ष रो. प्रफुल सोळंकी, सहसचिव रो. प्रविण शिलवंत, लर्निंग फॅसिलिटेटर रो. डॉ. प्रशांत गायकवाड, पब्लिक इमेज चेअर रो. प्रा. संभाजी मुळे, हेल्थ अँड स्पोर्ट्स चेअर रो. डॉ. सुशिल पन्हाळकर, यंग लीडर कॉन्टॅक्ट रो. डॉ. विद्या तोडे, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार, समन्वयक रो. सुनील उगले आणि सीएसआर चेअर रो. आकाश बाफना यांनी आपापल्या पदांची जबाबदारी स्वीकारली.

या सोहळ्यास रो. वर्षा पिट्टी, रो. प्रविण देशपांडे, रो. नितीन धाडे, रो. भिमाशंकर शिंदे, रो. अमर गुरप, रो. अनिल तोरडमल यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच क्लबचे सदस्य अमोल तातेड, बाळासाहेब पेचे, केतन चोरडिया, डॉ. भरत दारकुंडे, संजय लहाने, जुबेर पठाण, डॉ. भरत देवकर, डॉ. विकी दळवी, महेश यादव यांची उपस्थिती होती.

जामखेड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप गुगळे, कांतीलाल कोठारी, शैक्षणिक क्षेत्रातील जानमोहंमद पठाण, उमेश देशमुख, माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बी. ए. पारखे, उपमुख्याध्यापक अनिल देडे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, बबन काका काशीद, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मोरे, प्रशासकीय क्षेत्रातील उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, सामाजिक क्षेत्रातील मोहनशेठ ढाळे, किसनराव पेचे, राजू काका देशपांडे यांच्यासह पत्रकार बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

मान्यवरांच्या उपस्थितीमुळे पदग्रहण सोहळ्याला विशेष उत्साहाचे व दिमाखाचे स्वरूप प्राप्त झाले.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या सामाजिक कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. समाजातील गरजू घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्यासह आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प नव्या टीमने केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!