Monday, September 28, 2026
Home शैक्षणिक बातम्या गोव्यात ल. ना. होशिंग विद्यालयाच्या पायल गवळीची दमदार कामगिरी! 11.05 मीटर गोळाफेक...

गोव्यात ल. ना. होशिंग विद्यालयाच्या पायल गवळीची दमदार कामगिरी! 11.05 मीटर गोळाफेक करत पश्चिम विभागात द्वितीय क्रमांक, सिल्व्हर मेडलसह चेन्नईच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
2
गोव्यात ल. ना. होशिंग विद्यालयाच्या पायल गवळीची दमदार कामगिरी! 11.05 मीटर गोळाफेक करत पश्चिम विभागात द्वितीय क्रमांक, सिल्व्हर मेडलसह चेन्नईच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

जामखेड न्युज – – – – – – 

गोव्यात ल. ना. होशिंग विद्यालयाच्या पायल गवळीची दमदार कामगिरी!

11.05 मीटर गोळाफेक करत पश्चिम विभागात द्वितीय क्रमांक, सिल्व्हर मेडलसह चेन्नईच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

गोवा येथील अटल स्टेडियमवर दि. 26 ते 29 सप्टेंबर 2026 या कालावधीत पार पडलेल्या 37व्या वेस्ट झोन ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेडच्या विद्यार्थिनीने उल्लेखनीय कामगिरी करत जामखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेली कु. पायल गणेश गवळी हिने 16 वर्षे वयोगटातील गोळाफेक क्रीडा प्रकारात तब्बल 11.05 मीटर अंतरावर गोळा फेकत पश्चिम विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्राप्त झाले आहे.

 

पायलच्या या यशामुळे तिची आगामी राष्ट्रीय ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली असून, ऑक्टोबर महिन्यात चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे पायलच्या कामगिरीकडे संपूर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पायल गवळी हिला क्रीडा शिक्षक राघवेंद्र धनलगडे, बापू जरे, धीरज पाटील आणि प्रल्हाद साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, मेहनत, शिस्त आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे पायलने पश्चिम विभागीय स्तरावर दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेची दारे खुली केली आहेत.

पायलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाने तिचे अभिनंदन केले.
तसेच विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्यासह सर्व अध्यापक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पायलचे कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

पश्चिम विभागीय स्पर्धेत मिळवलेले रौप्यपदक आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही ल. ना. होशिंग विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीची आणखी एक अभिमानास्पद नोंद ठरली आहे.

आता चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत पायल आणखी दमदार कामगिरी करून विद्यालयाचे, जामखेडचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावेल, असा विश्वास क्रीडाप्रेमी आणि विद्यालय परिवारातून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!