Saturday, June 27, 2026
Home ताज्या बातम्या वारंवार पेपर का फुटतात? आमदार सत्यजित तांबे यांचा मोठा आरोप

वारंवार पेपर का फुटतात? आमदार सत्यजित तांबे यांचा मोठा आरोप

0
2

जामखेड न्युज – – – – 

वारंवार पेपर का फुटतात? आमदार सत्यजित तांबे यांचा मोठा आरोप

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने 28 जून रोजी होणारी परीक्षा रद्द करावी लागली. आधी नीटची परीक्षा पेपर फुटल्याने पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्याचे धागेदोरे हे महाराष्ट्रामध्येच आढळले होते. त्यानंतर आता टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने शिक्षक तसेच विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय पेपर फुटीवरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे. असे असताना विधान परिषदेचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी सूचक पोस्ट करत घडलेल्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली.

“कधी MPSC, कधी NEET आता TET. विभागातील भ्रष्टाचार हेच पेपर फुटीचे मुख्य कारण आहे.” असे आमदार सत्यजित तांबे यांनी टीका केली आहे. “ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने 28 रोजी होणारी परीक्षा रद्द करावी लागली.

या परीक्षेला यंदा 4 लाख 28 हजारांहून अधिक उमेदवार बसणार होते. काही दिवसांपूर्वी NEET, CBSE मूल्यांकनातील गोंधळ, UGC-NET आणि विविध प्रवेश व भरती परीक्षांमधील अनियमितता यामुळे प्रत्येक वेळी लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया जातो. तसेच, यामुळे येणारी उदासीनता आणि मानसिक नैराश्य तर वेगळंच.” असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.

“TET चे प्रकरण थोडे वेगळे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सेवेत राहण्यासाठी नोकरी असलेल्याही सर्व शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे 20-30 वर्षे सेवा केलेले शिक्षकही जे आपल्या सेवापूर्तीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यांनादेखील आपली नोकरी वाचवण्यासाठी ही परीक्षा पास होणे अनिवार्य आहे.

त्यामुळे ही परीक्षा पास करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांच्या स्वप्नांवर एकप्रकारे घाला घालण्याचेच पाप या व्यवस्थेने केले आहे.” असे म्हणत आमदार सत्यजित तांबे यांनी निशाणा साधला.

“आता देशाला स्वातंत्र्य मिळून लवकरच जवळपास 80 वर्षे होतील. जग AI आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचले आहे. पण आपण अजूनही पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा व्यवस्था उभी करू शकलो नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? आजही आपण MPSC चे निकाल वेळेवर देऊ शकत नाही, परीक्षा कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन घेतो. या सर्वच विषयांवर मी परवाच विधिमंडळात आवाज उठवत याकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

खरंतर भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच ही व्यवस्था जाणीवपूर्वक सुधारली जात नाही. ही सिस्टीम सुधारूच नये, ही व्यवस्था पारदर्शक होऊच नये, अशीच काहींची मानसिकता आहे, हे माझे ठाम मत आहे.” असे म्हणत त्यांनी आपले म्हणणे मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!