जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नवीन मराठी ( लोकमान्य) शाळेचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ९ विद्यार्थी परिक्षेस बसले होते त्यापैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ५ विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत.
शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. १) आदमाने शार्दूल रविंद्र, २) कुलकर्णी अनघा वैभव, ३) परदेशी अथर्व शामसिंग, ४) दळवी अविष्कार शेखर, ५) राळेभात गार्गी राजेंद्र
वरील सर्व विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता १२ वी पर्यंत महिना एक हजार स्कॉलरशिप मिळणार आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रांती पवार, अमोल हजारे, संतोष बांगर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांचे अभिंनदन संस्था पदाधिकारी उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, बंडोपंत पवार, सुरेंद्र देशपांडे व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना राळेभात यांनी केले. व पुढील वाटचालीस सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या