Home ताज्या बातम्या जामखेड शहरातील जय मल्हार नगर (टेकाळे वस्ती), येथे उद्या श्री तुळजा भवानी...

जामखेड शहरातील जय मल्हार नगर (टेकाळे वस्ती), येथे उद्या श्री तुळजा भवानी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

0
5

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेड शहरातील जय मल्हार नगर (टेकाळे वस्ती), येथे उद्या श्री तुळजा भवानी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

 

जामखेड शहराती जय मल्हार नगर (टेकाळे वस्ती), येथे आई तुळजा भवानी मंदिर, जगदंबा महिला मंडळ यांच्या वतीने मंगळवार रोजी पांडुदेवा शास्त्री (सौताडा ), श्री. काळे देवा (जामखेड) यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रोहित (दादा) पवार आमदार कर्जत-जामखेड यांच्या उपस्थितीत श्री तुळजा भवानी मुर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बरेच वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या सर्वांच्या प्रखर इच्छा शक्ती व आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादाने आपल्या जय मल्हार नगर (टेकाळे वस्ती) येथे सुंदर असे तुळजा भवानी मंदिर निर्माण झाले.

अशा या भव्य दिव्य मंदिरामध्ये आई तुळजा भवानी सिंहासनावर आरुढ झालेली पाहण्यासाठी आता सर्वांनाच आस लागलेली आहे. आपल्या भागातील सासरी नांदत असलेल्या लेकी बाळांनी आपल्या आईच्या मंदिरावर कलश स्थापन करण्यासाठी आपल्या संसारातुन फुल न फुलाची पाकळी आर्थिक देणगी देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे.

श्री. पांडुदेवा शास्त्री (सौताडा ), श्री. काळेदेवा (जामखेड) यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजा भवानी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ वैशाख कृ. ।।१०।। मंगळवार दि. १२ मे २०२६ ते १४ मे २०२६ या दरम्यानआयोजित केला आहे.

तरी सर्व लेकी बाळांनी आवर्जुन कार्यक्रमास यावे वआई तुळजा भवानी चे आशिर्वाद प्राप्त करुन प्रसाद घ्यावा हि अपेक्षा.दि. १२ मे २०१६ रोजी दि. १३ मे २०१६ रोजी सायं. ४ ते ८ मिरवणुक स. ९ वा आईचे स्नान, होमहवन व रात्री जागरण होईल 

दि. १४ मे २०१६ रोजी स. ९ वा आईचे स्नान, मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन ह.भ.प.उत्तम महाराज वराट (साकत) यांचे शुभहस्ते गुर्ती प्राणप्रतिष्ठाह.भ.प. भोरे महाराज (देवदैठण) यांचे शुभहस्ते कलशारोहन

श्री तुळजा भवानी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व॥ कलशारोहण सोहळा ||वैशाख कृष्ण ।। १० ।। दि. १२/०५/२०२६ ते १४/०५/२०२६|| कार्यक्रमाची रुपरेषा

भव्य शोभा यात्रादि. १२/०५/२०२६ रोजी सायं. ०५ वा.मुर्ती प्राणप्रतिष्ठा, महा संकल्प पुण्याहवाचन, देवता आवाहन जलाधिवास, स्नपन, हवनारंभदि. १३/०५/२०२६ रोजी सकाळी ०९ वा.मुख्य प्रतिष्ठा हवन, मुर्ती / कलश स्थापनक्षेत्रपाल पुजन, बलिदान पुर्णाहुतीदि. १४/०५/२०२६ रोजी सकाळी ११ वा.प्रमुख उपस्थिती
मा. आ. रोहित (दादा) पवारआमदार कर्जत-जामखेड

दि.१४/०५/२०२६ रोजी श्री. श्रीनिवास बिराजदार (सर) यांचा महाप्रसाद होईल. ठिकाण :- जय मल्हार नगर (टेकाळे वस्ती), जामखेड.जगदंबा नवरात्र उत्सव समिती,जामखेड, जि. अहिल्यानगर असे आवाहन संयोजक सौ. वराट ताई | श्री. बिभिषण मामा धनवडे यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!