Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये अतिक्रमणामुळे दररोजचीच वाहतूक कोंडी धुळ व खाचखळग्यामुळे वाहनधारक हैराण, नागरिकांचे...

जामखेडमध्ये अतिक्रमणामुळे दररोजचीच वाहतूक कोंडी धुळ व खाचखळग्यामुळे वाहनधारक हैराण, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0
4

जामखेड न्युज—–

जामखेडमध्ये अतिक्रमणामुळे दररोजचीच वाहतूक कोंडी

धुळ व खाचखळग्यामुळे वाहनधारक हैराण, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 

तीन वर्षापासून शहरातील रखडलेला राष्ट्रीय महामार्ग तसेच दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे यामुळे शहरात दररोजच वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरील खाच खळगे व धुळ यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे व रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी होत आहे.

जामखेड शहरातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर रांग लागत असून वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला आहे.

या कोंडीमागे रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम हे एक प्रमुख कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच चौक परिसरातील दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर मोटारसायकली व इतर वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अधिकच अरुंद होत आहे. परिणामी वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.

काही वेळा वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असल्याने रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे.या समस्येवर तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी जामखेड करांकडून होत आहे.

अठरा महिन्यांची मुदत असताना तीन वर्षे झाले तरी रस्ता होत नाही. राज्यातील सर्व अतिक्रमणे निघतात जामखेड शहरातील अतिक्रमणे का निघत नाहीत. राज्यात दोन वजनदार नेते असतानाही अतिक्रमण निघत नाही. रस्ता होत नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D वरील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेत संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, पाथर्डी यांच्या कार्यालयामार्फत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

चौकट

सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई हवी!
महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र कारवाई सर्व ठिकाणी समान व निष्पक्ष झाली पाहिजे. दिनांक १व २ एप्रिल रोजी झालेल्या संयुक्त मोजणीत समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर परिसरातही महामार्गाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले असून, तेथेही तातडीने कारवाई करावी.
— अवधूत पवार (सामाजिक कार्यकर्ते)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!