“औषधनिर्माणशास्त्र हे मानवी आरोग्य आणि कल्याणाशी निगडित शास्त्र” – प्राचार्य महेश भालसिंग कै. देवराव दिगांबर वराट यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त काॅलेज आँफ फार्मसी मध्ये व्याख्यानमाला संपन्न
“औषधनिर्माणशास्त्र हे मानवी आरोग्य आणि कल्याणाशी निगडित शास्त्र” – प्राचार्य महेश भालसिंग
कै. देवराव दिगांबर वराट यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्तकाॅलेज आँफ फार्मसी मध्ये व्याख्यानमाला संपन्न
औषधनिर्माणशास्त्र हे मानवी आरोग्य आणि कल्याणाशी निगडित असे अत्यंत महत्त्वाचे शास्त्र आहे. काळानुसार त्यात अनेक बदल आणि प्रगती होत असली, तरीही या शास्त्राला कोणताही पर्याय संभवत नाही.” “जगभर वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन लसींपैकी एक लस भारतीय बनावटीची आहे, त्यामुळे भारत हा संपूर्ण जगासाठी ‘जागतिक फार्मसी’ म्हणून ओळखला जातो.” असे मत प्राचार्य महेश भालसिंग यांनी व्यक्त केले.
कै. देवराव दिगंबर वराट काॅलेज आँफ फार्मसी मध्ये देवराव वराट यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त व्याख्यानमाला आयोजित केली होती यात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, औषधनिर्माण शास्त्र हे केवळ औषधे तयार करण्याचे क्षेत्र नसून, मानवी जीवनमान उंचावण्याचे आणि निरोगी समाज घडवण्याचे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे.
औषधनिर्माण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून जलद आणि अचूक आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व.देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी, साकत चे प्राचार्य डॉ. गोरक्ष बारगजे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा मेडिकल ट्रस्ट फार्मसी कॉलेज शेवगावचे प्राचार्य महेश भालसिंग संस्थेचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड चे माजी उपसभापती तथा संचालक कैलास वराट, विश्वास भुसारी,उपप्राचार्य शुभम जाधव, रमेश डिसले, स्वामी गीते, कैलास माने, श्रीमती कांचन बडे, कार्यालयीन अधीक्षक श्रीकृष्ण पुलवळे, अशोक नेमाने व गौतम लहाने व विद्यार्थी उपस्थित होते.
स्व. देवराव दिगंबर वराट यांच्या पुण्य स्मरणानिमित्तसंत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष कैलास वराट व सचिव प्रा. अरूण वराट हे दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. या वर्षी फार्मसी काॅलेज मध्ये व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.