Home शैक्षणिक बातम्या उपजिल्हाधिकारी धनंजय बांगर यांचेकडून बांधखडक शाळेची अक्षरा वारे सन्मानित केरळमधील भारतीय...

उपजिल्हाधिकारी धनंजय बांगर यांचेकडून बांधखडक शाळेची अक्षरा वारे सन्मानित केरळमधील भारतीय अवकाश संशोधन संस्था (I. S.R.O.) येथे अभ्यासदौ-यासाठी निवड झाल्याबद्दल गौरव

0
6

जामखेड न्युज ——-

उपजिल्हाधिकारी धनंजय बांगर यांचेकडून बांधखडक शाळेची अक्षरा वारे सन्मानित

केरळमधील भारतीय अवकाश संशोधन संस्था (I. S.R.O.) येथे अभ्यासदौ-यासाठी निवड झाल्याबद्दल गौरव

 


महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने नायगाव मंडल अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे शुक्रवार दि.२४ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडकची विद्यार्थीनी कु. अक्षरा अमोल वारे हिचा कार्यक्रमाचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी तथा परिविक्षाधीन तहसीलदार धनंजय बांगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित भारतीय अवकाश संशोधन संस्था (I.S.R.O.)येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या विमान सहलीसाठी इयत्ता ५ वीच्या गटातून जामखेड तालुक्यातून निवड झाल्याबद्दल तिला सन्मानित करण्यात आले. अक्षरा ही बांधखडक शाळेतील एक कुशाग्र बुद्धिमत्तेची विद्यार्थीनी असून उत्कृष्ट क्रीडापटू आहे. त्रिमूर्तीनगर नेवासा फाटा येथे यावर्षी झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत तिने कर्णधार म्हणून अत्युत्कृष्ट कामगिरी केली होती. तसेच सन २०२४-२५ मध्ये अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या कथाकथन स्पर्धेत तिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.

विविध स्पर्धा परिक्षांसह कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील तिची कामगिरी उल्लेखनीय असून तिला वर्गशिक्षक तथा मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांच्यासह विकास सौने व नितीन घालमे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

अक्षराने वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारून जिद्द व सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या साहाय्याने भविष्यात उच्चपदस्थ अधिकारी बनावे अशा शुभेच्छा श्री. बांगर यांनी देऊन बांधखडक शाळेतील शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, साहाय्यक गटविकास अधिकारी विजय शेवाळे, मंडल कृषी अधिकारी पोळ , प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डा येथील आरोग्य अधिकारी डॉ. अजित देशमुख , मंडल अधिकारी नंदकुमार गव्हाणे, पंचक्रोशी विद्यालय नायगावचे मुख्याध्यापक ज्ञानदेव साळवे , ग्रामपंचायत अधिकारी किशोर टकले यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या देशभक्तीपर लेझीम नृत्याविष्काराने यावेळी सर्वांना मंत्रमुग्ध केले.संपूर्ण कार्यक्रमाचे दर्जेदार सूत्रसंचालन करणारे नायगाव शाळेचे मुख्याध्यापक विक्रम डोळे यांच्यासह उपाध्यापक नितीन वराट व संतोष थोरात यांचा उल्लेखनीय शैक्षणिक व निवडणूक कार्याबद्दल यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!