राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. जामखेड संपकऱ्याच्या वतीने दररोज वेगवेगळे उपक्रम राबवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल पेन्शन दिंडी आयोजित करण्यात आली होती. तर आज बोलक्या बाहुल्या म्हणजे टकमकराव हे संपकऱ्याच्या मदतीसाठी आले व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांला सविस्तर उत्तरे दिली.
यावेळी शाळेत भात कोणी शिजवायचा, जनगणना कोणी करावयाची, निवडणूका कोणी घ्यावयाच्या, शाळेची बेल कोणी वाजवायची, आँनलाईन माहिती कोणी भरायची सर्व काही शिक्षकांनी, तरीही शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्यावर रोजंदारी करावी लागते असे का तर पेन्शन नाही म्हणून मग शिक्षकांना जुनी पेन्शन कशी उपयोगी आहे हे टकमकराव यांनी सांगितले. जवळा येथील उपक्रमशील शिक्षक संतोष सरसमकर हे बोलक्या बाहुल्या म्हणजे अर्धवटराव यांना घेऊन संपाच्या ठिकाणी आले. यावेळी शिक्षकांनी काही प्रश्न विचारले तर शिक्षक शिक्षकेत्तर भरती, जुनी पेन्शन योजना, आरोग्य सुविधा याविषयी टकमकराव यांनी सविस्तर वक्तव्य केले.
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र पाडळे,ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, रमेश अडसुळ, पी. टी. गायकवाड, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सचिव संतोष पवार, मोहन यादव, सुर्यकांत कदम, भाऊसाहेब इथापे,दत्तात्रय राजमाने, अनिल देडे, उपाध्यक्ष जाकिर शेख, सहसचिव भागवत चांगुणे, कैलास वराट, राघवेंद्र धनलगडे, भाऊसाहेब इथापे, अमोल भोंडवे, खजिनदार हनुमंत वराट, अर्जुन रासकर, मयूर भोसले, बबन राठोड, रोहित घोडेस्वार, त्रिंबक लोळगे, शिक्षकेत्तर संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुखअतुल दळवी, महसूलचे नंदुरबार गव्हाणे, रविंद्र शेटे, विकास मोराळे, तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष सुजित गोडगे, रमेश कांबळे, दादा शेख, सर्फराज शेख, विलास आजबे,आरोग्य विभागाचे मुबारक शेख, संपत घंटे, लहू जेधे, निलेश खाडे, चंद्रकांत वनवे, सागर गुंडयांच्या सह शिक्षण, महसूल, आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.
मंगळवार २१ एप्रिलपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात राज्यातील तब्बल १७ लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. जामखेड तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर, आरोग्य, महसूल यासह अनेक विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे चार दिवसांपासून शाळा, तहसील कार्यालय, कृषी, आरोग्य विभागाची कार्यालये ठप्प झाले आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार असा निर्धार समन्वय समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
काल सकाळी दहा वाजता टाळ पखवाज घेऊन करो तहसील आवारात आले. शासनाला जाग आणण्यासाठी ज्ञानोबा तुकाराम च्या गजरात एक, दोन, तीन, चार पेन्शन चा जयजयकार, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एकच मिशन जुनी पेन्शन, कर्मचारी एकजुटीचा विजय असो, हम सब एक है अशा घोषणा टाळ मृदंग च्या गजरात मागणी केली. यामुळे संपूर्ण तहसील परिसर भक्ती मय वातावरणात दुमदुमून गेला होता.
काल तहसील आवारात टाळ-मृदंगाच्या गजरात पेन्शन दिंडी काढणे हे आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे एक प्रभावी आंदोलन आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या (OPS) मागणीसाठी वारकरी पद्धतीचा वापर करून ही दिंडी काढली होती. “आमची पेन्शन आम्हास द्या”, “जुनी पेन्शन लागू करा” अशा आशयाची भजने आणि अभंग याद्वारे गायली. यामुळे तहसील कार्यालयात पेन्शन चाच आवाज घुमला होता.