जामखेड न्युज ——
ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेजचे प्रा. प्रल्हाद साळुंखे यांना जामखेड भुषण पुरस्कार
ल ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. प्रल्हाद साळुंखे यांना शिव – फुले – आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवामध्ये मान्यवरांच्या हस्ते जामखेड भुषण पुरस्कार देण्यात आला. यामुळे ल. ना. होशिंग विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

प्रा. साळुंखे यांना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, अमित चिंतामणी, महेश निमोणकर यांच्या सह अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्रा. प्रल्हाद साळुंखे यांनी चंदिगड येथे झालेल्या खेलो मास्टर गेम्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 गोळा फेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. यामुळे विद्यालयासह तालुक्याचा मान उंचावला होता.

राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते यामुळे वर्ल्ड मास्टर गेम्स 2027, कन्साई (जपान) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रा. साळुंखे यांची निवड झालेली आहे. याच उतुंग कामगिरी मुळे जामखेड भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जामखेड न्युजशी बोलताना प्रा. साळुंखे म्हणाले की, माझी निवड झाली आहे.पहिल्याच प्रयत्नात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे. याच कामगिरीचा विचार करून जामखेड भुषण पुरस्कार देण्यात आला आहे. या यशामागे माझ्या कुटुंबीयांचा व संस्थेचा व मित्रमंडळी यांचा वाटा आहे.




