महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी नवनाथ बहिर तर संघ प्रणित मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी विकास हजारे यांची निवड
दिनांक 15.4.2026 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे(संभाजीराव थोरात) त्रैवार्षिक अधिवेशन व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सन्मान सोहळा राज लॉन्स जामखेड या ठिकाणी पार पडला.
या कार्यक्रमासाठी संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे,राज्य उपनेते आदरणीय रावसाहेब रोहकले गुरुजी जिल्हाध्यक्ष प्रवीणजी ठुबे, अविनाश निंभोरे, मिलिंद तनपुरे, शरद कोतकर, गणेश वाघ, संचालक सूर्यभान काळे, शिक्षकनेते राम निकम सर, शिक्षक बँकेचे संचालक संतोषकुमार राऊत सर, शिक्षक नेते नारायण राऊत सर, शिक्षक नेते किसन वराट सर तसेच नगरपरिषद जामखेड चे नगराध्यक्ष प्रांजलताई चिंतामणी व सर्व नगरसेवक व जामखेड तालुक्यातील असंख्य शिक्षक बंधू व भगिनी उपस्थित होते.
यावेळी राज्याचे अध्यक्ष श्री बाळासाहेब मारणे यांनी शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्यावे व इतर अशैक्षणिक कामे यापासून मुक्तता करावी तसेच शिक्षकांच्या विविध अडचणी नगराध्यक्ष व विविध पदाधिकाऱ्यां समोर मांडल्या.
प्रसंगी शिक्षकनेते श्री राम निकम सर, श्री संतोष राऊत सर श्री नारायण राऊत सर श्री किसन वराट सर यांच्या मार्गदर्शनाने संघाच्या विविध कार्यकारणी निवडण्यात आल्या.
यामध्ये प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्ष पदी नवनाथ बहिर सर, कार्यकारी अध्यक्ष रामहरी बांगर, संघ प्रणित मंडळ अध्यक्ष विकास हजारे, कार्यकारी अध्यक्ष महेश मोरे, महिला आघाडी अध्यक्ष अर्चना भोसले मॅडम, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष दत्तात्रय यादव, पदवीधर संघ अध्यक्ष मल्हारी पारखे,युवा संघ अध्यक्ष विजय रेणुके, उच्चाधिकार समिती अध्यक्ष विकास बगाडे यांची निवड करण्यात आली.
तसेच अनेक शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदी बढती मिळाल्याने व स्पर्धा परीक्षेतून केंद्रप्रमुख पदी निवड झालेल्या बांधवांचा सन्मान करण्यात आला या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी तालुक्यातून असंख्य बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहून तालुक्यातील शिक्षक नेते यांनी सर्व शिक्षक बांधव व भगिनींचे आभार मानले.