Home ताज्या बातम्या वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान काळाची गरज – सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी.

वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान काळाची गरज – सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी.

0
10

जामखेड न्युज—–

वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान काळाची गरज – सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी

मृत्यूनंतरही एक व्यक्ती अनेक डाॅक्टर घडवू शकतो. हो, हे खरे आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? मात्र, हे शक्य होत आहे देहदानाच्या माध्यमातून. वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्र शिकण्यासाठी हे मृतदेह महत्त्वाचे ठरतात. निकषानुसार १० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह असावा.

परंतु, आजघडीला २० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे देहदान काळाची गरज आहे असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षणासाठी देहदानाची (Body Donation) नितांत गरज असून, सध्या महाराष्ट्रातील अनेक सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मृतदेहांचा तुटवडा भासत आहे. विद्यार्थ्यांच्या शरीररचनाशास्त्राच्या (Anatomy) अभ्यासासाठी प्रत्यक्ष देह महत्त्वाचे असतात.

सध्या जास्तीत जास्त पालकांचा तसेच मुला/ मुलीचा कल हा वैद्यकीय शिक्षण घेण्याकडे वाढत आहे तसेच त्याप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या व शिक्षण घेणाऱ्यांची intake capacity ही वाढत आहेत. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा चांगला राहण्यासाठी त्याचे प्राथमिक शिक्षण हे मृतदेहा वरतीच करावे लागत असते.

वाढत्या वैद्यकीय संस्था व विद्यार्थ्याचे वाढलेले नंबर पाहता, शिक्षणासाठी अशा मृतदेहाची ही आवश्यकता वाढली आहे. त्यामुळे ही वाढलेली गरज लोकांमध्ये “देहदानाचे” प्रबोधन करून त्यांचे वैद्यकीय शिक्षणात असलेले महत्त्व समजून जास्तीत जास्त लोकांनी या देहदनाच्या चळवळीत भाग घेण्यात यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री संजय कोठारी यांनी केले.

तसेच बेवारस मृतदेह हे सुधा पोलिस विभागाच्या योग्य कार्यवाही नंतर ( पंचनामा ) ( नैसर्गिक मृत्युनंतर ६ तासाच्या आत ) जवळील वैद्यकीय महविद्यालयात देता येते (महाराष्ट्र anatomy कायदा २०१४ Bombay anatomy act १९४९ नुसार तसेच आत्तापर्यंत ५०८ लोकांनी फॉर्म भरले असून २७ लोकांचे देहदान केले आहे.

तरी आपण आपला देहदान नेत्रदान अवयदान कोठारी प्रतिष्ठान यांच्या ऑफिसमध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे संकल्प अभियान मध्ये फॉर्म भरून घ्यावा.


या कामासाठी अहिल्यानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेजचे शरीर रचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुधीर पवार यांच्या सहकार्याने करत आहोत. असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी बोलतांना सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!