शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी दिले नियुक्ती पत्र
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वानुसार शिवसेना काम करत आहे यानुसार नेहमीच समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यात अग्रेसर असणाऱ्यांना शिवसेना पक्षात नेहमीच संधी मिळते यानुसार जामखेड शिवसेना शहरप्रमुख पदी मोहन देवकाते यांची निवड करण्यात आली आहे.
मोहन देवकाते हे जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यात नेहमीच अग्रेसर असतात त्यांनी नगरपरिषद निवडणूकही प्रभाग एक मधून लढवली होती. त्यांत त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यांच्या वर पक्षाने शहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.
मोहन देवकाते यांना सदर निवडीचे पत्र शिवसेना अहिल्यानगर जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या हस्ते देण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील , ज्येष्ठ नेते कैलास जाधव , तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे ,युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण बोलभट , माजी नरसेवक गणेश आजबे, विधीसेवा तालुका प्रमुख अँड.रोहित काळे,
अँड.नितीन राजपुरे,अँड.भगवानराव जायभाय,अँड.बाळासाहेब घोडेस्वार,अँड.रूपेश पाटील,अँड.प्रदिप बोलभट,नवनाथ पाचरने, डॉ.श्याम गोलेकर,किरण मराळ,कुलदीप पवार ,विकी पिंपळे सर्व पदाधिकारी शिवसेना,युवासेना उपस्थित होते.