जीवनात यशस्वीतेसाठी चौफेर वाचन आवश्यक – शशिकांत देशमुख
मुंबईचा यश पाटील स्वा.सै.कै. मधुकाका देशमुख वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
यशस्वी आणि प्रगल्भ आयुष्यासाठी चौफेर वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे केवळ शब्द संग्रह आणि भाषा कौशल्य सुधारते जगाकडे पाहण्याचा एक सखोल चिकित्सक आणि बहुआयामी दृष्टिकोन विकसित होतो. वाचनाने प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता जिद्द व चिकाटीने यश कसे खेचून आणता येते असे मत माजी सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड महाविद्यालय आणि ल.ना. होशिंग विद्यालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा.सै.कै. मधुकाका देशमुख स्मृती प्रित्यर्थ अंतरमहाविद्यालीयन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. उद्धव बापु देशमुख अध्यक्ष म्हणून होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री सागर अहिवळे नव उद्योजक व पर्यावरण प्रेमी पुणे ,होते. संस्थेचे सचिव मा.श्री. अरुण काका चिंतामणी, संस्थेचे सहसचिव डॉ. सुनील कटारिया , संचालक डॉ . प्रताप गायकवाड,संचालक मा. श्री. दीपक होशिंग,माझी सचिव शिशीकांत देशमुख, मा. श्री. लक्ष्मीकांत देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुराणे एस .जी, ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य पारखे सर, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“हरितदूत ” म्हणुन परिचित असलेले मा. श्री. सागर अहिवळे यांनी आपल्या जीवनातील विविध अनुभव सांगितले. एका सामान्य घरातील मुलगा नव उद्योजक म्हणून मोठी भरारी घेतो ही प्रेरणा सामान्य घरातील मुलांनी घ्यावी, आपण जिद्द चिकाटी ठेवून स्वतःचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा. माझ्या कडून विद्यार्थांना जेवढे सहकार्य करता येईल तेवढे मी करेल हा शब्द दिला. उद्घाटनाचे अध्यक्ष मा. श्री. उध्दव बापु देशमुख यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पुराणे यांनी केले. सलग १४ वर्षे महाविद्यालय व ल.ना.होशिंग विद्यालय ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करत असल्याचे प्राचार्य डॉ. पुराणे म्हणाले.तसेच या स्पर्धेचे स्वरूप आणखी वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.पाहुण्यांचा परिचय मा.श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. फलके ए. बी यांनी मानले.
समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अरुण काका चिंतामणी होते. प्रमुख पाहुणे मा. श्री. शिशीकांत देशमुख होते.
उत्तम वक्तृत्व कौशल्यामुळे भविष्यात अनेक संधी – भुषण देशमुख
प्रेक्षकांसमोर बोलल्यामुळे आत्मविश्वास वाढतो जो भविष्यात नेतृत्व करण्यासाठी आवश्यक आहे.उत्तम वक्तृत्व कौशल्यामुळे स्पर्धा परीक्षा, वकील राजकारणी, शिक्षक, पत्रकार किंवा व्यवस्थापक अशा अनेक क्षेत्रांत यशाची दारे उघडी असतात.
मा.श्री. अरूण काकांनी विजयी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम यश रविंद्र पाटील (मुंबई विद्यापीठ मुंबई ) व्दितीय संकेत कृष्णात पाटील (शिवराज महाविद्यालय गाडहिंग्लज कोल्हापूर) तृतीय अनिकेत रामा वनारे (संताजी महाविद्यालय नागपूर ) उत्तेजनार्थ १) खेळे दिक्षा बबन (दादा पाटील महाविद्यालय) २) किंबहुणे अक्षता विनायक (जामखेड महाविद्यालय जामखेड)
परीक्षक मा.श्री. भुषण देशमुख , प्रा. म्हस्के स्वप्निल , प्रा.मस्के जी. आर, होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मस्के जी. आर यांनी केले.
आभार प्रा. अडाले मॅडम यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.तरटे एन. बी, प्रा. मोहळकर एस. डी. यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.