NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे यश
सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फौडेशन जामखेड संचलित साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, पाडळी येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) 2025-26 मध्ये उज्ज्वल यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची भक्कम परंपरा अधोरेखित केली आहे.
या प्रतिष्ठित परीक्षेत घवघवीत यश मिळवणारे गुणवंत विद्यार्थी अनुष्का हनुमंत कार्ले , करण बापूसाहेब सांगळे, श्रेया शिवाजी पवार व रोहन गणेश कानडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. या यशाबद्दल संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड- भोरे मॅडम, संचालक प्रा. तेजस भोरे, तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी भोरे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालय व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला असून या यशामुळे साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयाने गुणवत्ता, संस्कार आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.