सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारींचा सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार

0
210
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची जैन कॉन्फरन्स दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी    तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिद्धिविनायक प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार करण्यात आला.
  संजय कोठारी हे नेहमीच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. ४०-४५ वर्षांपासून अपघातात सापडलेल्या अपघातग्रस्तांना नेहमी मदतीत आघाडीवर असतात, वृक्षारोपण, विविध सामाजिक कामे, दिंड्याचे स्वागत आदिसह विविध पातळ्यांवर अडचणीत सापडलेले सर्वसामान्य नागरिक, प्राणी, पक्षी यांना मदत करणे व मदत मिळवून देण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना जीवदान मिळून त्यांचे संसार वाचवण्याचे काम कोठारी यांनी केले आहे. तसेच जैन समाजातही त्यांचे काम मोठे आहे. यामुळे त्यांची जैन कॉन्फरन्स दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.
ADVERTISEMENT   
           या निवडीबद्दल नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या सिध्दिविनायक प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अध्यक्ष सुंदरराव देशमुख, सचिव सचिन देशमुख, संचालक रामचंद्र होशिंग, महेश (प्रदीप) कुकरेजा, बाळासाहेब मोरे ,सुहास देशमुख, जिज्ञासू अरोरा, योगेश देशमुख, देविदास महाडीक, राजेंद्र लोहार, संतोष वीर, बजरंग देशमुख, पवन देशमुख, प्रवीण होळकर, अक्षय शेळके, अतिष कोळपकर, महेश कात्रजकर, पत्रकार धनराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here