Home क्राईम न्यूज मिरजगाव पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, दरोडा टाकून डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद ...

मिरजगाव पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, दरोडा टाकून डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद पंधरा लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनलाही गुन्हे

0
4

जामखेड न्युज—–

मिरजगाव पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, दरोडा टाकून डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद

पंधरा लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनलाही गुन्हे

गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर ते सोलापूर जाणारे राष्ट्रीय महामार्गावर मिरजगाव पोलीस स्टेशन, कर्जत पोलीसस्टेशन, जामखेड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये ट्रकमधून व कंटेनर वाहनांमधून मोठ्या प्रमाणात डिझेल चोरीचे गुन्हे घडत होते.

त्या अनुशंगानेअहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांनापोलीस स्टेशन हद्दीत व परिसरामध्ये नाकाबंदी व पेट्रोलींग करून डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या.

पोलीस अधिक्षक अहिल्यानगर सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत, प्रविणचंद्र लोखंडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय झंजाड, सहायक पोलीस निरीक्षक व तपास पथक हे डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत काम करत होते.

यापूर्वी अनेक वेळा अहिल्यानगर सोलापूर हायवेवर मोठमोठे ट्रक व कंटेनर मधील 400, 500 लिटर डिझेल चोरी जात असले बाबत तक्रारी प्राप्त होत्या, परंतु ट्रक चालक हे परराज्यातील असल्या कारणाने कोणीही पोलीस स्टेशनला FIR करत नव्हते.

दि. ११/०२/२६ रात्री ००.२० वा. सुमारास पोकों राजेंद्र गाडे, चालक पोहेकॉ अशोक रक्ताटे असे रात्रग्रस्त दरम्यान पेट्रोलिंग करीतअसताना एक संशयास्पद स्विफ्ट कार व स्कॉर्पिओ कार भरधाव वेगाने जाताना निदर्शनास आली म्हणून त्यांनी सदर कारचा पाठलाग करतअसताना सदर स्विफ्ट कार ही तिखी गावचे शिवारामध्ये मिरजगाव ते कडा जाणारे रोडवर एका पोलला धडकल्याने सदर स्वीट कारमधील ०३ संशयित इसम हे कार सोडून पळून गेले होते व स्कॉर्पिओ चा पाठलाग केला असता स्कॉर्पिओ गाडी ही आष्टी, जि. बीड च्यादिशेने पळून गेली होती.

मिळून आलेल्या स्विफ्ट कारची झडती घेतली असता त्यामध्ये डिझेल चोरीचे साहित्य ड्रम व पाईप व ०३ लोखंडीकोयते मिळून आले. सदर बाबत पळून गेलेल्या अनोलखी ०५ इसमांविरुद्ध मिरजगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 49/2026 बी एन एसकलम 310 (4) 310( 5 ) अन्वये पोकॉ राजेंद्र गाडे यांचे फिर्यादीवरून दरोडा तयारी व प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिरजगाव पोलीस स्टेशनचे पथक सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व स्टाफयांनी नमूद गुन्ह्यातील गाडी सोडून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेवून सदर गुन्हयात आरोपी नामे- 1) भगवान गोवर्धन पठारे, वय-40 वर्षे, रा. सालेवडगाव, ता. आष्टी, जि. बीड, 2) सुनिल प्रमोद श्रीवास्तव, वय 40 वर्षे, रा. खाडवानाका, तेजाजीनगर, इंदोर,मध्यप्रदेश, हल्ली रा. सालेवडगाव, ता. आष्टी, जि. बीड, 3) गणेश नवनाथ दहातोंडे, वय 20 वर्षे, रा. सालेवडगाव, ता. आष्टी,जि. बीड, 4) आकाश दत्तु मोरे, वय 34 वर्षे, रा. नांदगाव, ता नादंगाव, जि. नाशिक, हल्ली रा निमगाव चोभा, ता. आष्टी,जि. बीड यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे. सदर गुन्ह्याचे तपासात अटक आरोपींकडून 1) 10,00,000/- रु. किं. ची एक स्कॉर्पिओ गाडी नं. MH 15 GR 2882,
25,00,000/- रु. कि. ची एक स्वीफ्ट कार नं.MH 14 CC 6977, व वेगवेगळ्या कंपनीचे तीन मोबाईल, एकूण 07 निळ्या रंगाचे 40 लीटर मापाचे रिकामे ड्रम, डिझेलकाढण्यासाठी लागणारे दोन पाईप, 03 लोखंडी कोयते, दोन मिरचीच्या पुड्या, एक पांढऱ्या रंगाची दोरी असा एकूण 15,15,000/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर अटक आरोपींकडे विश्वासात घेवून तपास केला असता त्यांनी 1) जामखेडपो.स्टे गुन्हा रजि. नं. 16/2026 बी. एन. एस कलम 303 (2) प्रमाणे, 2) कर्जत पो स्टे गुन्हा रजि. नं. 426/ 2025 बी. एन. एस कलम 303 (2)प्रमाणे दोन गुन्हे केल्याची कबूली दिलेली आहे. तसेच सदर आरोपींनी मिरजगाव, कर्जत, जामखेड व परिसरामध्ये इतर डिझेल चोरीचेएकूण 18 ठिकाणी अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

सदर कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक, श्री. सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर श्री.वैभव कलबुर्गे, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग प्रविणचंद्र लोखंडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मिरजगावपोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय झंजाड, सफ/ सुनिल माळशिखरे, पोना / विकास चंदन, पोना/ गणेशठोंबरे, पोकॉ/ सुनिल खैरे, पोकों/ गोकुळ पळसे, पोकॉ/ राजेंद्र गाडे, पोकॉ/ बळीराम काकडे, चालक पोहेकॉ / रक्ताटे मोबाईल सेलचेपोकॉ/ नितीन शिंदे, राहूल गुंडू अशांनी मिळून केली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / विजयजाड हे करित आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!