जामखेड न्युज——-
जामखेड मध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर आठच दिवसांत त्याच हाॅटेल वर पुन्हा हल्ला हाॅटेल मालक जखमी
जामखेड मधील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह
हॉटेल मधिल जेवणाच्या बिलावरुन हॉटेल न्यु कावेरी या चालकास टोळक्याने कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण करित गंभीर जखमी केले. तसेच हॉटेलची तोडफोड करून हॉटेल चे नुकसान केले. या प्रकरणी एकुण नऊ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषेश म्हणजे काही दिवसापूर्वींच याच हॉटेलवर बाहेरील गुंडांनी गोळीबार करीत दहशद पसरवली होती. आठ दिवसांत दुसरा हल्ला झाला आहे. यामुळे जामखेड मधील कायदा व सुव्यवस्था याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

अधिक माहिती अशी की काही दिवसापूर्वी याच ठिकाणी असलेल्या हॉटेल न्यु कावेरी या ठिकाणी झालेल्या गोळीबारात फीर्यादीचा भाऊ रोहीत अनिल पवार हा गंभीर जखमी झाला होता. ही घटना ताजी असतानाच याच हॉटेलवर दुसर्या घटनेत नऊ जणांच्या टोळक्याने फिर्यादीत जेवणाच्या बीलावरुन कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्याच्या वर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी फिर्यादी सिध्देश पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश अजिनाथ विटकर, रवी भगवान पवार, राहुल साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) चेतन साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) चौघे रा. भुतवडा रोड ता. जामखेड, शुभम साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) रा. गोडाऊन गल्ली, जामखेड व इतर चार जण आशा एकुण नऊ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की फिर्यादीचा भाऊ मोहित पवार याचे आरोपी ऋषिकेश विटकर, रा. भुतवडा रोड याच्या सोबत जेवणाच्या बीलावरुन दि 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता वाद झाला होता. यानंतर ऋषिकेश अजिनाथ विटकर, रवी भगवान पवार, राहुल साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) चेतन साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) चौघे रा. भुतवडा रोड ता. जामखेड, शुभम साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) रा. गोडाऊन गल्ली, जामखेड व इतर अनोळखी चार जण आसे एकुण नऊ जण याच दिवशी रात्री नऊ वाजता हॉटेल कावेरी या ठिकाणी आले व जेवणाच्या बीलावरुन झालेल्या वादामुळे न्यु कावेरी हॉटेलच्या काचा फोडल्या, तसेच हॉटेल मधिल खुर्च्याची तोडफोड केली.

यावेळी फिर्यादी हा त्यांना अडवत आसताना रवी भगवान पवार याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच इतर लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी सिध्देश पवार याच्या डोक्याला आठ टाके तर मनगटाला सहा टाके असे एकुण चौदा टाके पडले आहेत.








