८ वी च्या विद्यार्थ्याचा “चोर” या विषयावरील निबंध वाचून वाटेल आश्चर्य

0
1704

जामखेड न्युज——-

८ वी च्या विद्यार्थ्याचा “चोर” या विषयावरील निबंध वाचून वाटेल आश्चर्य

सध्याची पिढी खुपच स्मार्ट आहे असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय सध्या एक बातमी खुपच व्हायरल होत आहे ती म्हणजे आठवीच्या विद्यार्थ्यांने चोर या विषयावर लिहिलेला निबंध

“चोर”

चोर हे देखील देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते रोजगारनिर्मिती आणि देशाच्या विकासात आपले मोठे योगदान देतात.सेफ, कुलुपे, लॉकर, कपाटे इत्यादी वस्तू फक्त चोरांमुळेच तयार केल्या जातात. या वस्तू बनवणाऱ्या अनेक कारखान्यांना आणि कामगारांना चोरांमुळे रोजगार मिळतो.

घरांमध्ये कुलपे, ग्रील्स, दरवाजे आणि खिडक्यांवर लॅच बसवण्यासाठी मिस्त्री आणि कामगारांना काम मिळते, घर, दुकान, शाळा, कॉलेज, ऑफिस आणि कारखाने चोरांपासून वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि वॉचमन आवश्यक असतात.CCTV कॅमेरे, मेटल डिटेक्टर, सुरक्षा यंत्रणा बनवणाऱ्या कंपन्यांना देखील रोजगार मिळतो.

चोरांमुळे पोलीस अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, न्यायाधीश, वकील यांनाही काम मिळते.पोलीस दलासाठी लागणारी बॅरिकेड्स, शस्त्रे, गोळ्या, दंडुके, गणवेश, वाहने इत्यादी खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. चोरांमुळे तुरुंग, जेलर आणि तुरुंगातील कर्मचारी यांनाही रोजगार मिळतो.

मोबाईल, लॅपटॉप, कार, मोटरसायकल, घरगुती वस्तू, पर्स किंवा लिपस्टिक चोरी गेल्यानंतर लोकांना त्या पुन्हा खरेदी कराव्या लागतात — त्यामुळे व्यापार वाढतो.आणि प्रसिद्ध तसेच नामांकित चोर राजकारणात प्रवेश करून आणखी मोठ्या चोरीला हात घालतात.एकूणच पाहता, देशाच्या अर्थव्यवस्थेत चोरांचे योगदानही कमी नाही!

शिक्षकांनी या “संशोधनसमृद्ध” निबंधाला १००% गुण देऊन त्या विद्यार्थ्याला मेरिट लिस्टमध्ये स्थान दिले. दृष्टिकोन महत्त्वाचा असतो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here